महिलांमध्ये वाढत आहे हार्टअ‍ॅटॅकचा धाेका

    22-Sep-2022
Total Views |

Health
भारतीय महिलांच्या जीवनशैलीत राेज हाेणाऱ्या बदलांमुळे त्यांच्यात हृदयराेगाचा धाेका वाढत आहे. एका सर्व्हेनुसार या महिलांमध्ये अ‍ॅस्ट्राेजनचा अभाव हे हृदयराेगाचे मुख्य कारण आहे. सर्व्हेनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांमध्ये हृदयासंबंधित आजारांमध्ये 17 ते 22 टक्के वाढ झाली आहे.पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयराेगांची संख्या वाढत आहे.भारतात शहरी महिलांमध्ये हल्ली हृदयराेगाचा गंभीर धाेका आहे. याचे कारण अत्यधिक ट्रान्सफॅट, साखर व मीठ खाणे, कमीशारीरिक व्यायाम, वाढता तणाव, दारू व सिगारेटसारख्या हानिकारक पदार्थांचे व्यसन यासाेबत अनेक गाेष्टी सामील आहेत.हृदयराेगाचा धाेका सर्वांत जास्त 35 ते 44 वर्ष वयाच्या महिलांना आहे.याचा धाेका घरात राहणाऱ्या महिलांनाही तेवढाच असताे जेवढा बाहेर काम करणाऱ्या महिलांना. लाे एचडीएल आणि हाय बीएमआय दाेन अशी महत्त्वाची कारणे आहेत जी महिलांमध्ये हृदयराेगाचा धाेका लहान वयातही वाढताे.