करण ख्रिश्चन अँडरसन हे सॅन ्रॅन्सिस्काे युनिव्हर्सिटीमध्ये व्यायामतज्ज्ञ म्हणून काम करतात. ते म्हणतात, की व्यायामामुळे सेराेटाेनिन, डाेपामाइन या उत्साहवर्धन करणाऱ्या रसायनांची निर्मिती हाेत असल्यानं व्यायामानंतर आपल्या मनाला शांत, आनंदी, उत्साही वाटतं. सुयाेग्य विचार करण्याची क्षमता ही व्यायामाची देणगी आहे. ते म्हणतात की, व्यायामातून मिळणारे ायदे हा काही एकट्या दुकट्या व्यक्तीचा अनुभव नाही, तर सर्वमान्य, सर्वपरिचित अनुभूती आहे.व्यायाम किती आणि कुठला? व्यायाम कुठला करावा हा प्रश्नही बऱ्याच जणांना पडताे.व्यायामाचे तीन प्रकार मानले जातात.
हृदयासाठी- उदा. एराेबिक किंवा कार्डिओ, शक्तीसाठी वजनं घेऊन व्यायाम आणि लवचिकतेसाठीचा व्यायाम- उदा. याेगासनं. एराेबिक व्यायामाचा ायदा हृदयाला आणि ुफ्ुसांना हाेत असल्यानं मेंदूला त्याचा ायदा जास्त हाेताे. आपल्याकडे याेगासनं करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे, परंतु एराेबिक व्यायाम तितका लाेकप्रिय नाही. एराेबिक व्यायाम करण्यासाठी जिममध्येच जायला पाहिजे असंही काही नाही. साधं वेगानं चाललात तरी असा व्यायाम हाेऊ शकताे. जिन्यानं खालीवर करून, सायकल चालवून, दाेरीच्या उड्या मारूनही अशा प्रकारचा व्यायाम हाेऊ शकताे. चार दिवस एराेबिक, दाेन ते तीन दिवस शक्तीसाठी आणि दाेन दिवस लवचिकतेसाठी, असं व्यायामाचं नियाेजन चांगलं मानलं जातं.
सूर्यनमस्कार, जाेर, बैठका या आपल्या पारंपरिक व्यायामांमुळेही तब्येत कमावता येते.ज्यांना दुसरंतिसरं काहीच करणं शक्य नाही, त्यांच्यासाठी चालणं हा सर्वाेत्कृष्ट व्यायाम आहे. व्यायामामध्ये शक्यताे वेगळेपण ठेवायला हवं. राेज एकाच प्रकारचा व्यायाम केल्यामुळे शरीराच्या ठरावीक भागालाच ायदा हाेताे. त्यात वैविध्य आणल्यामुळे शरीराच्या प्रमुख स्नायूंना ायदा हाेऊ शकताे. अर्थातच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. त्यामुळे ज्या व्यायामामुळे मन ताजंतवानं हाेतं, प्रुल्ल हाेतं, ताे व्यायाम आपल्याला चांगला, असं ढाेबळपणे समजायला हरकत नसावी.