3 हजार 300 वर्षांपूर्वीच्या गुहेत आढळल्या कलाकृती

22 Sep 2022 14:16:16
 
 

Caves 
 
पुरातत्त्व शास्त्रज्ञांना रविवारी इस्राइलमध्ये प्राचीन इजिप्शियन फाराे रामेसेस काळापासूनची एक प्राचीन आणि दुर्मीळ दफनगुहा सापडली. ही गुहा डझनभर मातीची भांडी आणि कांस्य कलाकृती असलेल्या वस्तूंनी भरली हाती. ही गुहा सुमारे 3 हजार 300 वर्षे जुनी आहे.उत्खननादरम्यान पालमाहिम नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या व्य्नतीने जेव्हा मशीनने खाेदकाम सुरू केले तेव्हा त्यामध्ये माेठा खड्डा पडला. गुहेच्या छताचा छाेटासा भाग काेसळला. यानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी या मानवनिर्मित गुहेत उतरण्यासाठी शिडीचा वापर केला.
 
इस्राइलच्या पुरातन वास्तू प्राधिकरणाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये या गुहेत डझनभर मातीची भांडी आढळली. प्राचीन इजिप्शियन राजा 1213 इसपूर्व मरण पावला. गुहेत हाडे, कवटी, स्वयंपाकाची भांडी, साठवण भांडी, दिवे आणि पितळेचे बाण आणि भाले हाेते.
गुहेच्या काेपऱ्यात दाेन आयताकृती भूखंडांमध्ये अखंड सांगाडाही सापडला.मातीची भांडी सायप्रस, लेबनाॅन, उत्तर सीरिया, गाझा आणि जाफा यांच्यातील व्यापारी दळणवळणाचा पुरावा आहे.
Powered By Sangraha 9.0