येथील बेरी ड्रेव्हिट बार्लाे (वय 52) आणि टाेनी (वय 27) या ‘गे’ जाेडप्याने सराेगसी टे्निनकद्वारे जन्मलेल्या नवजात बाळासाठी 23 काेटी रु. ची याॅट आणि 27 लाख रुपयांचे कपडे खरेदी केले आहेत. या भाग्यशाली बाळाचे नाव टर्किन आहे.टर्किनला अगाेदरच 7 भाऊ-बहीण असून, या सर्वांचा जन्म सराेगसी टे्निनकद्वारेच झाला आहे. या गे जाेडप्याने टर्किन प्रमाणेच सातही मुलांसाठी महागड्या याॅट आणि महागडे कपडे खरेदी केले आहेत. हे जाेडपे मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सर्वांसाठी सारखाच, पण भरपूर खर्च करतात. हे जाेडपे काय उद्याेग करते हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.कारण इतका प्रचंड खर्च करण्यासाठी कमाई सुद्धा भरपूरच हवी.