‘वर्क फ्राॅम हाेम’ला साठ ट्नके तरुण पदवीधरांची पसंती

    21-Sep-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Work 
 
जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि त्यासाठी नाेकरी-व्यवसाय करावा लागताे. प्रत्येक पिढीत नाेकरीबाबतच्या अपेक्षा बदलत्या असतात. 1990 ते 2000 या काळात जन्मलेल्या मुलांचा उल्लेख ‘जनरेशन झेड’ असा केला जाताे. ही मुले त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळी आहेत आणि एम्प्लाॅयरकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षाही भिन्न आहेत. या पिढीत नाेकरी करण्याची श्नयता कमी असून, 1980-1990 या काळात जन्मलेल्या ‘मिलेनियल्स’च्या तुलनेत अमेरिकेच्या कामगार वर्गात (लेबर फाेर्स) ‘जनरेशन झेड’ची भागीदारी चार टक्के कमी आहे. अन्य श्रीमंत देशांतही हा ट्रेंड दिसून आला असून, रिमाेट पद्धतीने काम करण्याच्या तंत्रामुळे अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. लाेक आता घरून काम करतात आणि शहरातील महागाई टाळण्यासाठी अनेकांनी छाेट्या शहरांत माेठी घरे घेऊन काम करणे सुरू केले आहे.
 
‘मायक्राेसाॅफ्ट’च्या ताज्या ‘वर्क ट्रेंड इंडे्नस’मधून ही माहिती मिळते. ‘जनरेशन झेड’मधील निम्म्यापेक्षा जास्त पदवीधरांनी रिमाेट पद्धतीने काम करणे पसंत केले असल्याचे त्यातून दिसते. कंपनीने या संदर्भात यंदाच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत 31 देशांतील 30 हजारांपेक्षा जास्त लाेकांचे मत जाणून घेतले हाेते. सर्व वयाेगटांतील 38 टक्के लाेकांना रिमाेट काम हवे आहे. सल्लागार क्षेत्रातील ‘मेकिन्से’ या कंपनीच्या माहितीनुसार, 18 ते 34 वर्षे वयाेगटांतील सुमारे साठ टक्के पदवीधर ऑफिसबाहेरून कामाचा पर्याय नसेल, तर नाेकरी साेडणे पसंत करतात. या लाेकांना कामामध्ये लवचिकता आणि सवलती हव्या आहेत. ज्या उद्याेगांत घरून काम करण्याचे जाॅब नाहीत त्यांना तरुण पदवीधर नाकारतात. बांधकाम, वित्त, आदरातिथ्य आणि मॅन्युफॅ्नचरिंगसारख्या क्षेत्रांत रिमाेट कामाची संधी कमी असल्यामुळे या क्षेत्रांत कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवायला लागली आहे.
 
अमेरिकेत हा बदल सर्वांत जास्त दिसताे. तेथील तरुण शेअर बाजार-वाॅल स्ट्रिट आणि टे्ननाॅलाॅजी कंपन्यांचा गड असलेल्या सिलिकाॅन व्हॅलीकडे माेठ्या संख्येने वळत आहेत. बँकिंग क्षेत्रातील जाॅब माेठ्या प्रमाणात संपल्यामुळे आणि 2007-09च्या आर्थिक संकटामुळे बँकिंग उद्याेगाची प्रतिष्ठा संपून माेठ्या बँकांपेक्षा टे्ननाॅलाॅजी क्षेत्रातील कंपन्यांकडे ही तरुणाई आकर्षित झाली. ब्रिटनमध्ये 2011 ते 2020 या काळात काॅम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास ट्न्नयांनी वाढून तीस हजारांपेक्षा जास्त झाली. 2020मध्ये 31 हजार तरुणांनी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केला आणि 2011च्या तुलनेत हे प्रमाण 21 ट्न्नयांनी जास्त हाेते.माेठ्या बँकांच्या तुलनेत टे्ननाॅलाॅजी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा देण्यास जास्त तयार आहेत. ‘युनिव्हर्सम’ या कंपनीच्या ताज्या रँकिंगमध्ये त्याची झलक दिसते. 2008मध्ये सर्वांत चांगला राेजगार देणाऱ्यांत बड्या बँका आणि डेलाॅइट, इवाय, केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या कंपन्या हाेत्या. पण, 2021पर्यंत राेजगार देणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांत सात टे्ननाॅलाॅजी आणि मीडिया कंपन्या हाेत्या. टेक कंपन्यांबाबतचे आकर्षण ‘जनरेशन झेड’मध्ये थाेडे कमी हाेत असल्याचे मात्र दिसले आहे.
 
गुंतवणूकदारांच्या थंड्या प्रतिसादामुळे या वर्षी अल्फाबेट, मेटा, मायक्राेसाॅफ्ट आणि उबरसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती कमी केली आहे. ट्विटरने जाॅब ऑफर्स मागे घेतल्या आहेत, तर नेटफ्ल्निसने शेकडाे कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.काॅइनबेस आणि राॅबिनहूडसारख्या नव्या कंपन्यांची स्थितीसुद्धा अशीच आहे. ‘क्रंटबेस’ या डेटा फर्मच्या अंदाजानुसार, 2022मध्ये आतापर्यंत 22 हजार जणांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. कुशल तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी सुविधा आणि वेतनात वाढ केली आहे. चमचमीत चविष्ट जेवण, मालिश आणि दुपारच्या डुलकीची साेय अशा सवलती दिल्या जात आहेत. गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पाॅप गायक लिझाे याची सेवा घेतली आहे. जेपी माॅर्गन चेस, गाेल्डमॅन साॅ्नस, सिटी ग्रुप, मेकिन्से आणि बीसीजी यांनी एनलिस्टचे वेतन वर्षाला एक लाख डाॅलर केले आहे. बीपी या ब्रिटिश एनर्जी कंपनीने नव्या पदवीधरांना सहा हजार डाॅलर भरती बाेनस आणि सवलतीच्या दरात कार देण्याची सुविधा दिली आहे.