निसर्ग पर्यटनाला चालना देणार : मुनगंटीवार

21 Sep 2022 15:00:02

Tourism
पेण तालुक्यात जागतिक दर्जाचे इकाे पार्क उभारण्यासाठी चचा पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून, निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान (इकाे पार्क) उभारता येईल का, याविषयी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई आणि परिसरातील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने काम करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वन जमिनीवर इकाे पार्क तयार करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली.
या वेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगाेपाल रेड्डी, निसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थपकिय संचालक विकास गुप्ता, निखिल गांधी आदी उपस्थित हाेते.राज्यात विपुल वनसंपदा असून, या माध्यमातून काही नवीनतम लाेकाेपयाेगी प्रयाेग करता येतील का, असा विचार सतत मनात येताे. त्यातूनच ही इकाे पार्कची संकल्पना असून, वन कायदा, अधिकार आणि इतर सर्व नियमांची शहनिशा करुन, आवश्यक ती पूर्तता करुन जागतिक दर्जाचा इकाे पार्क महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहाेत. यासाठी प्रसंगी जगातील सर्वाेत्तम तंत्रज्ञान, या विषयातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0