बुडत्या चित्रपट क्षेत्राला आता पाैराणिक तडका

    21-Sep-2022
Total Views |

Ramsetu
मध्यंतरी पाैराणिक, सामाजिक कथानकाऐवजी पाश्चात्त्य चित्रपटांची न्नकल करण्याचा प्रयत्न झाला; पण भारतीय प्रेक्षकांना हा प्रकार आवडला नाही. चित्रपट शाैकिनांनी मल्टिप्ले्नसकडे पाठ फिरविली आणि बाॅलिवूड आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडले.बाॅलिवूडला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा पाैराणिक चित्रपटांचा आधार घेण्यात येत असून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर आता रामसेतू, रामायण (थ्रीडी आवृत्ती), अश्वत्थामा, द्राैपदी आणि सीता : द इनफाॅर्मेशन, हे चित्रपट प्रदर्शित हाेणार आहेत. देशभरात अशी भावना निर्माण झाली की, बाॅलिवूडमध्ये फ्नत हिन्दी चित्रपटच तयार हाेतात. इतर प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांना गाैण स्थान आहे.
 
एखादा धार्मिक किंवा विनाेदी चित्रपट हिट झाला की, तशाच चित्रपटांची रांग लागत असे. परंतु गेल्याकाही वर्षांपासून साऊथ इंडियन चित्रपटांच्या हिंदीत डब केलेल्या चित्रपटांनी बाॅलिवूडवर आक्रमण केले. त्यातच काेराेना महामारीचा फटका बसला. साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीशी सहकार्य करून चित्रपट क्षेत्राला ‘भारतीय’ स्वरूप देण्याची गरज हिन्दी चित्रपट निर्मात्यांना उमगली आहे. नितेश तिवारी आणि मधु माटे हे 500 काेटींच्या बजेटचे थ्रीडी फाॅर्मेटमध्ये रामायण रूपेरी पडद्यावर पुन्हा आणत आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेत तयार हाेणार आहे. त्यात ऋतिक राेशन, दीपिकासाेबतच साऊथ इंडियन अभिनेते महेश बाबू, ज्युनियर टी. रामारावसहित हिंदी, तामिळ व तेलुगू चित्रपट कलाकार दिसणार आहेत.