मुलाखतीला पूर्ण तयारीने सामाेरे जा

    21-Sep-2022
Total Views |
 
 

Interview 
 
टेलिाेन राउंड : या राउंडमध्ये एचआर तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती विचारेल. यावेळी एचआरजवळ तुमचा रेझुमे असेल. ्नत तुम्ही दिलेली माहिती बराेबर आहे का, तुमचे संवाद काैशल्य आणि तुमचा इंटरेस्ट याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.तुम्हाला तुमच्या रेझुमेमधील प्रत्येक ओळ माहीत असावी. तुमच्या बाेलण्यातून तुम्ही कंपनी आणि जाॅबमध्ये भरपूर उत्सुक आहात, हे सांगता आले पाहिजे. या राउंडमध्ये तुम्ही उमेदवार/कर्मचारी म्हणून कंपनीसाठी याेग्य आहात का, याचीही पडताळणी केली जाते.
 
 
मुलाखत : या राउंडमध्ये तुमचे शिक्षण, अनुभव याबद्दल प्रश्नाेत्तरे हाेतात. इथे प्रश्न तुमच्या शिक्षण, पूर्वीचा अनुभव आणि जाॅब रिक्वायरमेंटवर आधारित असतात. साधारणतः एक ते दीड तास चालणाऱ्या या राउंडची विभागणी 3 भागांत केली जाते
1) तुमची माहिती 2) प्रश्नाेत्तरे 3) तुमचे प्रश्न. इथे काळजी घ्यावी.
 
मुलाखतीला जाताना...
 
1) ताजेतवाने आणि चांगल्या ाॅर्मल/ऑिफस कॅज्युअल पाेशाखात जा. उपाशीपाेटी जाणे टाळा.
2) मुलाखत घेणाऱ्यांचे हसतमुखाने हस्तांलाेदन करा. हँडशेक कसा करावा, याबद्दल भरपूर माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल.
3) बसताना खुर्चीचा आवाज हाेणार नाही आणि तुम्ही ताठ बसाल, याची काळजी घ्या.
4) प्रश्नांची उत्तरे देताना आयकाॅन्टॅक्ट ठेवा. उत्तरे आत्मविश्वासाने द्या.
5) तुमच्याबद्दल माहिती सांगताना तुम्ही या जाॅबसाठी कसे परिपूर्ण आहात, याचा उल्लेख करा.
6) प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी प्रश्न नीट ऐका. प्रश्न समजला नसेल, तर आदरपूर्वक पुन्हा विचारा.
7) प्रश्न साेडवण्याअगाेदर अथवा साेडवताना त्या प्रश्नाशी निगडित तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.
8) एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल, तर घाबरून जाऊ नका. प्रश्न साेडवायचा प्रयत्न करा. प्रयत्न करूनही उत्तर सापडत नसेल, तर उत्तर माहीत नाही, हे निर्भयपणे सांगा. मुलाखतीतील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे यायलाच हवी असं काही नाही. 50% उत्तरे आत्मविश्वासाने दिलीत तरीदेखील मुलाखत यशस्वी ठरू शकते.
9) प्रश्न साेडवायचा प्रयत्न करताना मुलाखत घेणारा तुम्हाला संकेत (्नलू) देईल. त्या संकेतांचा वापर करा. न येणारे उत्तरदेखील मिळू शकेल.
10) प्रश्नाेत्तरे झाली की वेळ येते ती तुमच्या प्रश्नांची. तुम्हाला जाॅब व कंपनीबद्दल असलेले प्रश्न तुम्ही येथे विचारू शकता.
कमीतकमी 2-3 प्रश्न विचारणे ार गरजेचे आहे. याद्वारे तुम्ही या जाॅब आणि कंपनीबद्दल किती उत्सुक आहात हे दिसून येते.
मुलाखत ही प्रश्नाेत्तरे सत्र नसून कंपनीने तुम्हाला आणि तुम्ही कंपनी, जाॅब व भावी सहकाऱ्यांना जाणून घेण्याची संधी असते.
त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही काेण आहात, ते आत्मविश्वासाने सांगा आणि कंपनी, जाॅब व सहकाऱ्यांची माहिती आत्मविश्वासाने विचारा. लक्षात ठेवा आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.