दिवसभर शाळा झाल्यानंतर पुन्हा गृहपाठ म्हटले की, विद्यार्थ्यांच्या फार जिवावर येते.यासाठी अनेकांनी आपल्या आई-वडिलांचे तर अनेकांनी दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर आपल्या गुरुजींकडून जाेरदार धपाटे खाल्ले आहेत.आजकाल शाळेत शिक्षक मारत नसले, तरी गृहपाठ केला नाही, तर बाेलणी खावी लागतात.त्यामुळेच गृहपाठाला शैक्षणिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. अमेरिकेत मुलांना गृहपाठ द्यायचा की नाही, यावरून शाळेतील शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये वाद सुरू आह अमेरिकेत गृहपाठाच्या विराेधकांचे म्हणणे आहे की, मुलांचे याेग्य आकलन हाेत नसल्याने त्यांना गृहपाठ देऊ नये. त्याच वेळी, गृहपाठ समर्थक त्याचे फायदे सांगत आहेत.मुलांना गृहपाठ करता येत नसेल, तर त्यातही शिक्षकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असेही पुढे येत आहे. समाजशास्त्रज्ञ जेसिका मॅक्राॅय कॅलरेकाे, गणिताच्या अभ्यासक इलाना हाॅर्न आणि ग्रेस चेन यांनी यावर शाेधनिबंध सादर केले आहेत.
गृहपाठ मुलांना शिकण्यास मदत करताे याचा फारसा पुरावा नाही.शाळेत चांगली कामगिरी करणारी मुले त्यांच्या वैयक्तिक क्षमता, प्रयत्न आणि जबाबदारीमुळे असे करू शकतात. शिक्षकांनी मुलांच्या पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती ठेवावी, जेणेकरून त्यांना त्यांचे याेग्य मूल्यमापन करता येईल असे, मत या संशाेधकांनी मांडले आहे. गृहपाठाचे मूल्यमापन करताना मुलांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचा विचार केला पाहिजे. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेत गृहपाठ इतका संरचित आहे की, ताे लवकरच पूर्णपणे काढून टाकणे कठीण आहे. हे संशाेधन गृहपाठावर आधारित विद्यार्थ्यांना शिक्षा किंवा बक्षीस न देण्याची शिफारस करते हे अतिशय महत्त्वाचे. घरकामाच्या ओझ्यामुळे मुलांच्या आराेग्यालाही हानी पाेहाेचते, असे त्यांचे म्हणणे आहे.दुसरीकडे, माजी शिक्षक जाय कास्पियन कांग यांनी गृहपाठाच्या चांगल्या परिणामांचा अभ्यास केला आहे. ते म्हणतात की, गृहपाठ हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.विद्यार्थ्यांसाठी हे ओझे नाही. गृहपाठाची अडचण अशी आहे की, शालेय काम आणि गृहपाठाचा प्रभाव जास्त प्रमाणात माेजला जाऊ शकत नाही.