पाेटाच्या आजारांवर प्राथमिक उपचार करून बघा

    21-Sep-2022
Total Views |
 

Health 
अशावेळेस याेग चिकित्सकांचा सल्ला घेऊन तपासणीद्वारे निदान करणे आवश्यक ठरते. गरज वाटल्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही दिला जाताे. अन्यथा आजार वाढून जीवघेणा ठरताे.बद्धकाेष्ठता दरराेज सकाळी-संध्याकाळी सहज मल प्रवृत्ती व्हायला हवी. परंतु, अपचनामुळे मलत्याग करण्यास समस्या जाणवते. जाेर लावावा लागताे. मलही कठाेर हाेताे.दाेन चमचे काेमट दूध किंवा पाण्यात एरंडेल तेल टाकून रात्री प्यावं.छाेटा हिरडा चूर्ण दाेन ग्रॅम, साेनामुखीच्या पानांचं चुर्ण दाेन ग्रॅम, अमलतासचा गर तीन ग्रॅम मिसळून रात्री काेमट पाण्यातून घ्यावे.इसबगाेलचं चूर्ण तीन ग्रॅम काेमट पाण्यात मिसळून रात्री झाेपताना द्यावे.गॅस हाेणे पाेट ुगणे, पाेटात वेदना हाेणे किंवा वेदना एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी हाेणे ही स्थिती गॅसेसच्या समस्येस दर्शविते.रुग्णाला उलटं झाेपवून गरम पाण्याने शेकावे.
 
ओवा दाेन ग्रॅम, सुंठ दाेन ग्रॅम, काळं मीठ एक ग्रॅम लिंबाच्या रसात मिसळून चाखण्याने गॅस पास हाेतात.वेदनांपासून आराम मिळताे.
सहा मिली लसणाचा रस मधात मिसळून प्यावा.अजीर्ण झाल्यास अन्न व्यवस्थित न पचल्यास अजीर्णाची स्थिती निर्माण हाेते.यामध्ये आंबट ढेकर, जीव घाबरणे, पाेटदुखी अशी लक्षणं दिसतात.जेवणाआधी आलं पाच ग्रॅम आणि सैंधव मीठ या मिश्रणाचे सेवन करा.लसणाच्या चार-सहा पाकळ्या तेलात तळून खा.
 
काळे मिरे दाेन ग्रॅम, ओवा दाेन ग्रॅम, सुंठ दाेन ग्रॅम यांचे चूर्ण बनवून खाण्याने अपचनापासून मुक्ती मिळते. अ‍ॅसिडीटीमुळे जळजळ मिरची-मसाले अधिक प्रमाणात खाण्याने पाेटात अल्सरचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पाेटदुखी आणि जळजळ हाेते.आवळा पाच ग्रॅम, काेथिंबीर दाेन ग्रॅम, जिरे दाेन ग्रॅम चूर्ण बनवून सकाळसंध्याकाळ सेवन करा.जेष्ठमधाच्या चूर्णात पाच ग्रॅम मध मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन करा.अविपत्तिकर चूर्ण तीन ग्रॅम सकाळसंध्याकाळ घ्या.जड, मिरची-मसालेयुक्त पदार्थांचं सेवन टाळा. दुधाचं सेवन करा.अमिबीयाेसिस पाेटात मुरड्याबराेबर आव अशाप्रकारची मलप्रवृत्ती हाेते.लेंडीपिंपळ 3 ग्रॅम सकाळ-संध्याळ पाच ते सात दिवस घेण्याने ायदा हाेताे. पाणी उकळून प्या.ताजं दही किंवा ताकाचं सेवन अधिक करा.