आर्थिक बेजबाबदारपणाचे काही ठळक मुद्दे

    19-Sep-2022
Total Views |
 
 

finance 
देशाची असाे किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल तर अनेक समस्या आणि अडचणींना ताेंड द्यावे लागते. प्रसंगी कर्जबाजारी हाेण्याची वेळ येते. हे सगळे टाळायचे असेल तर पुढील मुद्दे लक्षपूर्वक वाचा आणि जर जास्तीत जास्त उत्तरं हाेकारार्थी येत असतील, तर तुम्हाला स्वत:च्या आर्थिक निर्णयांचे पुनरावलाेकन करण्याची गरज आहे असे समजा. खाली दिलेले मुद्दे हे आर्थिक अव्यवस्थेचे निदर्शक आहेत. - तुमच्यावर न टाळता येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत पण तुमचे उत्पन्न निश्चित नाही.तुमची बचत काहीच नाही किंवा खूप कमी आहे आणि तरीही तुमचे अनावश्यक खर्च खूप आहेत.तुम्ही दैनंदिन खर्चासाठी जीवन विम्यातून पैसे काढून घ्यायचा विचार करत आहात किंवा आधीच काढून घेतले आहेत.तुमचे एकूण हप्ते तुमची एकूण उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त आहेत.
 
तुमच्याकडे ऐनवेळच्या अडचणींसाठी निधी नाही. किंवा असेल तर ताे 3 महिन्याच्या खर्चापेक्षा कमी आहे.तुमची आर्थिक ध्येये ठरलेली नाहीत.अथवा आर्थिक ध्येयांचा प्राधान्य क्रम ठरलेला नाही.तुम्ही अनेक कर्जे घेतली आहेत आणि त्याचे हप्ते विविध तारखांना विविध बँक खात्यातून जातात. त्यामुळे तुम्हाला तुमचं कॅश बजेट नीट ठरवता येत नाही / पाळता येत नाही. आणि या सगळ्यामुळे हप्ते ठरल्या दिवशी भरले जात नाहीत.तुमची खरेदी आधी ठरलेली नसते.आवेगाच्या भरात तुम्ही माेठ्या खरेदी करता. अशा खर्चाची एकूण रक्कम तुमच्या मासिक पगारापेक्षा जास्त जाते.
 
तुम्ही अनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी कर्ज घेता. या वस्तूमधून नंतर काहीही उत्पन्न हाेत नाही.तुम्ही भाड्याच्या घरात राहता आणि त्याचे भाडे तुमच्या उत्पन्नाच्या 20- 25% पेक्षा जास्त आहे.तुमची देणी बाकी असून तुम्ही त्यासाठी भविष्यात मिळण्याची श्नयता सलेल्या उत्पन्नावर (बाेनस इत्यादी) भिस्त ठेऊन आहात.तुमची क्रेडीट कार्ड ची लिमिट संपली आहे, आणि त्याची बिल्स भरणे बाकी आहे. क्रेडीट कार्ड बिल वर तुम्हाला व्याज भरावे लागते. हे असे प्रसंग वरचे वर येत आहेत.आपल्या पैशाची, आपल्या भविष्याची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला आजपासूनच सुरुवात करा. आर्थिक नियाेजन करून सततच्या आर्थिक काळजीतून स्वत:ला मुक्त करा.