चष्म्यांच्या काडीला ओठांच्यामध्ये पाइपप्रमाणे ठेवणारे लाेक असे सवयीने करतात आणि संभाषणाच्या दरम्यान सावध राहून उत्तरे देणारे असतात.व्य्नती चष्मा काढून पुन्हा दुसऱ्यांदा लावत असेल, तर त्याचा अर्थ हा की, ती व्य्नती सर्व गाेष्टी आणि स्थितीला पुन्हा पाहू-समजू इच्छिते. बाेलताना व्य्नती चष्म्याच्या काड्यांची घडी घालून ठेवत असेल, तर त्याचा अर्थ हा की, त्याना संभाषणाची दिशा बदलायची आहे.जेव्हा काेणी व्य्नती आपला टाय सातत्याने खालीवर करत असल्यास त्याचा अर्थ आहे की, त्याला गुदमरल्यासारखे वाटत आहे.दुसऱ्यांसमाेर स्वत:ला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतानासुद्धा लाेक असे करतात. अशा लाेकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. टायला पुन्हा पुन्हा वरखाली करणारे लाेक अहंकारी, शिस्तप्रिय असतात. असे लाेक आपली कामे आणि वेळेचे व्यवस्थापन याविषयी जागरूक असतात.
हाताची घडी घालण्याचा अर्थ आहे, व्य्नती सुरक्षात्मक स्थितीत नकारात्मक विचारांनी घेरलेला आहे.सर्वसाधारणपणे लाेक असे लाइनमध्ये असताना, आपल्या पाळीची वाट पाहात, रेस्टाॅरंट किंवा अशा प्रत्येक ठिकाणी करतात जिथल्या अनाेळखी लाेकांमध्ये त्यांना असुरक्षित वाटते.दाेन्ही हातांच्या बाेटांना एकमेकांत 4गुंफून हातांना डाेके किंवा डाे्नयाच्या मागे मानेच्या थाेडे वर ठेवून डाे्नयाला आधार देत एका पायाला दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून बसण्याचा अर्थ आहे की, ती व्य्नती आत्मविश्वासपूर्ण आहे. आपल्या कामाविषयी व्यावसायिक दृष्टिकाेन ठेवताे आणि दुसऱ्या लाेकांच्या तुलनेत स्वत:ला श्रेष्ठ समजताे.एका पायाला खुर्चीच्या हँडलवर ठेवून थाेडे तिरपे हाेऊन बसण्याचा अर्थ आहे की, व्य्नती आरामाच्या मूडमध्ये आहे आणि आनंदी राहू इच्छिताे.
खुर्चीवर बसून दाेन्ही पायांना टेबलावर एकावर एक ठेवून बसण्याचा अर्थ आहे, व्य्नती समाेरच्यामध्ये रस घेत नाही.संभाषणादरम्यान असे वागणे संभाषण नकारात्मक हाेण्याचा संकेत आहे. सवयीने अशा स्थितीत बसणारे लाेक व्यवहारात निष्काळजी आणि साैम्य असतात.संभाषण करताना समाेरची व्य्नती खूप वेळ गप्प असेल आणि काेपराला टेबलावर टेकवून हाताने आपल्या चेहऱ्याला आधार देऊन बसली असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, व्य्नती तुमच्या बाेलण्याने कंटाळली आहे. यादरम्यान व्य्नतीने जांभई दिली तर त्याचा अर्थ आहे, बाेलणे ऐकता ऐकता त्याला झाेप येत आहे. हात हनुवटीच्या खाली ठेवून समाेरच्या व्य्नतीचे बाेलणे ऐकण्याचा अर्थ आहे की, व्य्नतीला तुमच्या बाेलण्यामध्ये रस आहे. ताे त्या विषयावर बाेलू इच्छिताे. असे सर्वसाधारणपणे व्य्नितगत रूपाने आवड दाखविणे किंवा सन्मान दाखविण्यासाठी सुद्धा केले जाते.सिगरेट पिऊन धूर वरच्या बाजूने साेडणारे लाेक आत्मविश्वासी, स्वत:ला श्रेष्ठ समजणारे आणि आशावादी असतात, तर खालच्या बाजूला धूर साेडणारे लाेक निराशावादी, संशयात राहणारे, तसेच रहस्य लपवण्याच्या प्रवृत्तीचे असतात.