लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यक्ती नव्हे; तर विद्यापीठ!

    16-Sep-2022
Total Views |
 
 
 

Sathe 
देवेंद्र फडणवीस यांचे गाैरवाेद्गार, माॅस्काेत अण्णा भाऊ पुतळा लाेकार्पणाचा संस्मरणीय साेहळा संपन्न लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यात माेठे संस्थात्मक काम केले.त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ हाेते, असे गाैरवाेद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.माॅस्काेत मार्गारिटा रुडामिनाे ऑल रशिया स्टेट लायब्ररी फाॅर फाॅरेन लिटरेचरच्या आवारात लाेकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लाेकार्पण करण्यात आले. त्या वेळी फडणवीस बाेलत हाेते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वे कर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आमदार सुधाकर भालेराव, अमित गाेरखे या वेळी उपस्थित हाेते.
 
माॅस्काे स्टेट लायब्ररीने हा उपक्रम हाती घेतला. मुंबई विद्यापीठाने यात भाग घेतला, याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानताे. लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रशियाचा दाैरा केला, त्या वेळी त्यांनी रशिया-भारत संबंध अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. रशियन क्रांतीतून त्यांना प्रेरणा मिळाली. हा त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा माेठा गाैरव आहे. प्रत्येक मराठीजनाचा हा गाैरव आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.दरम्यान, फडणवीस व अ‍ॅड. नार्वेकर यांनी रशियातील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. रशियन उद्याेग जगत आणि भारतीय दूतावासातील मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.युवा, स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव, भारत-रशिया संबंधांचाही अमृत महाेत्सव, निर्यात धाेरण, बंदरविकास, पर्यटन अशा विविध विषयांवर प्रश्नाेत्तरांचेही एक सत्र झाले. फडणवीस यांनी मनमाेकळी उत्तरे दिली.