पावसाळ्यात आजारांना कसे दूर ठेवाल ?

16 Sep 2022 14:20:55
 
 

Monsoon 
 
सध्या आपण बघताेय की, अनेक जण सर्दी-खाेकलातापाने त्रस्त आहेत. अशावेळेस स्वतःच्या आराेग्याची अधिक काळजी घेण्याची गरज अनेक पटींनी वाढते. त्यासाठी हे उपाय निश्चितच सहाय्यक ठरतील...
 
पाण्याची स्वच्छता : पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी येतं. म्हणून पाण्याच्या स्वच्छतेसाठी, शुद्धतेसाठी उपाय करणे आवश्यक ठरते. त्यासाठी पाणी उकळून घ्या, तुरटी लावा, उत्तम वाॅटर िफल्टरचा वापर करा.
 
गाेडापासून दूर रहा : जेव्हा पावसानंतर ऊन पडतं, तेव्हा खूप तहान लागते. अशावेळेस गाेड शीतपेयं पिण्यापेक्षा पाणी प्या. काकडीचं सूप, जलजीरा, ताक, नारळ पाणी हे उत्तम पर्याय आहेत.
 
फळभाज्यांची निवड : भाज्या नेहमी ताज्या, दर्जेदार असतील याची काळजी घ्या.शक्यताे हंगामी भाज्यांना प्राधान्य द्या. भाज्या स्वच्छ धुवा.
 
मिरची-मसाले कमी खा : पावसाळ्याच्या दिवसात पचनक्रिया मंदावते. पावसाळ्यात गरम भजी, वडे खाण्याची इच्छा हाेते. पण लक्षात ठेवा, जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. कारण यामुळे पाेटात अ‍ॅसिड आणि टाॅक्सिन निर्माण हाेतात.
 
घराच्या बाहेर असाल तेव्हा...
दह्याचं सेवन करू नका.
जे खाल ते गरम असावं.
चिरलेली फळं, सलाद आणि अन्य कच्च्या भाज्या म्हणजे भेळपुरी वगैरेचे सेवन करू नका.
बाहेर ज्यूस किंवा शेक पिणार असाल तर र्बाचा वापर टाळा.
Powered By Sangraha 9.0