मार्क झुकेरबर्गने 100 वर्षांचे घर विकून कमावला तिप्पट नफा

    16-Sep-2022
Total Views |
 
 

Home 
फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अंदाजे 100 वर्षांपूर्वीचे जुने घर 250 काेटी रु. ला विकले. या वर्षाची अमेरिकेतील हे सर्वांत माेठे डील आहे. हे घर विकून मार्क झुकेरबर्गने 10 वर्षांतच तिप्पटीपेक्षा जास्त नफा कमावला आहे. डाेलाेरेस पार्कजवळ लिबर्टी हिलमधील हे घर 1918 मध्ये बांधलेले आहे. हे 7 हजार चाैरस फुटांचे घर झुकेरबर्गने 2012 मध्ये 80 काेटी रु. ला खरेदी केले हाेते व आता 10 वर्षांनंतर हेच घर विकून त्यांनी 170 काेटी रु. निव्वळ नफा मिळवला आहे.