मशरूम भाजीच नव्हे, तर औषधही!

    15-Sep-2022
Total Views |
 
 

Mushroom 
 
मशरूम आधुनिक युगातील माेठी देणगी आहे. छत्री, भूमिकवच या नावानेही ताे ओळखला जाताे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्याची वेगवेगळी नावं आहेत. यास शाकाहारी मांस अशीही उपाधी देण्यात आली आहे. शाकाहारी भाज्यांच्या इतिहासात मशरूम एक अशी भाजी आहे, ज्यामध्ये 51 टक्के प्रथिनं, जीवनसत्त्व ब-क- के, पेन्टाेथेनिक अ‍ॅसिड, कॅल्शियम, ाॅस्फरस, पाेटॅशियम, लाेह आणि साेडियम आढळते.मशरूम स्टार्च, कर्बाेदकं, फॅट्स, शर्करा यांसारख्या घटकांनी पूर्णतः मुक्त आहे. म्हणूनच मशरूम मधुमेह, उच्च रक्तदाब, बद्धकाेष्ठता, लठ्ठपणा व हृदयरूग्णांसाठी आदर्श आहार मानला जाताे.
 
संयुक्त राष्ट्र खाद्य संघटनेने एका अध्ययनात नमूद केले की, मशरूममध्ये कर्कराेग विराेधी गुण भरपूर प्रमाणात आढळतात. एक काळ असा हाेता जेव्हा जगातील वृक्षांच्या मृत साली, सडलेल्या भूमित, पडलेल्या पानांमध्ये मशरूम आपाेआप येत. पण जशी याची मागणी वाढली तसं त्याचं विधिवत पीक घेतलं जाऊ लागलं.जगातील 80 देशांमध्ये मशरूम पिकवले जातात.मशरूम पाैष्टिक तर आहेतच शिवाय स्वादिष्टही. मशरूम केवळ भाजीच नाही तर औषध म्हणूनही त्याचा उपयाेग केला जाताे. यापासून प्रथिनं, जीवनसत्त्वांची पेस्ट तयार केली जाते.