शैक्षणिक सहकार्यासाठी विचारमंथन व्हावे : राज्यपाल

    15-Sep-2022
Total Views |
 
 

Education 
 
शैक्षणिक परिषदेत भारत व अमेरिकी विद्यापीठांना सूचना शिक्षणाला काेणत्याही भाैगाेलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदात सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांत उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचारमंथन हाेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी केले.राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांत शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने राज्यपालांच्या पुढाकाराने आयाेजित उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपतींच्या प्रमुख उपस्थितीत राजभवनात झाले.
 
या परिषदेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माइक हँकी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे प्रमुख, तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव पस्थित हाेते.महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आल्यास एकविसाव्या शतकातील शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत हाेईल.महाराष्ट्रातून दरवर्षी एक लाख विद्यार्थी परदेशात विविध विद्यापीठांत पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी अनेक उत्कृष्ट उत्पादने आणि कल्पना प्रदर्शित केल्या आहेत. अमेरिकेचे सामर्थ्य आणि भारताची भव्यता एकत्र येऊन भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करता येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.