मुख्यमंत्र्यांनी घेतले नाथांच्या समाधीचे दर्शन

    15-Sep-2022
Total Views |
 
 

CM 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाथांचे वंशज हरी पंडित गाेसावी, मिलिंद बुवा गाेसावी, रघुनाथ बुवा गाेसावी पालखीवाले, हमी याेजना मंत्री संदीपान भुमरे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, उद्याेगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित हाेते.