शैक्षणिक संस्थांनी काैशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा : चंद्रकांत पाटील

    13-Sep-2022
Total Views |
 
 
 

Education 
काैशल्य विकास प्रशिक्षण असेल, तरच पुढील काळात तरुणांना नाेकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी काैशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वताेपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे केले.जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे गाेवेलीत आयाेजित कार्यक्रमात पाटील बाेलत हाेते. आमदार किसन कथाेरे, आमदार कुमार आयलानी, नरेंद्र पवार, संस्थेचे संस्थापक रवींद्र घाेडविंदे आदी यावेळी उपस्थित हाेते. यावेळी प्रा. राजाराम कापडी लिखित ग्रंथालय संघटन आणि सुनीलदत्त तवरे लिखित संतांचे तत्त्वज्ञान या पुस्तकांचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. कीर्तनकार नवनित्यानंद महाराज उर्फ माेडक महाराज यांच्यासह परिसरातील कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला.देशात आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हवे ते शिक्षण मिळेल. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे समग्र ज्ञान मिळेल. तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी व कायद्याचे शिक्षण मातृभाषेतून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. आमदार कथाेरे यांनीही मनाेगत व्यक्त केले.