पुणे शहर तहसील कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर

    07-Aug-2022
Total Views |
 
HE
 
पुणे, 6 ऑगस्ट, (आ.प्र.)
 
स्वातंत्र्याच्या अमृत-देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यानिमित्त गुरुवारी पुणे शहर तहसील कार्यालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 450 व्यक्तींनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तर 65 हून अधिक व्यक्तीनीं रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन पुणे उपविभागाचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले. यावेळी पुणे शहर तहसीलदार श्रीमती राधिका हावळ-बारटक्के, कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोफत आरोग्य शिबिरात बी जे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय व औंध येथील जिल्हा रुग्णालय यांच्या आरोग्य पथकाने सहकार्य केले. यावेळी तहसीलदार कार्यालयात येणारे नागरिक, तहसील कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, कोतवाल यांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारच्या रक्तदान व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजात आरोग्याविषयी योग्य ती काळजी कशी घ्यावी आणि दक्ष राहण्याबाबत संदेश जातो, असे प्रतिपादन देशमुख यांनी केले. भविष्यतही असे लोकाभिमुख उपक्रम राबाबवावेत अशी सूचना त्यांनी केली व त्यास प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आरोग्य शिबिराचे कमी वेळात उत्तम नियोजन केल्याबद्दल देशमुख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले