विद्यार्थ्यांसाठी यश मिळवण्याचे उपाय

    06-Aug-2022
Total Views |

success
1. विद्यार्थ्यांनी अशा जागी अभ्यास करू नये जिथे बाहेरचा वारा सरळ आपल्यावर पडणार नाही, अर्थातच उघड्या खिडकी वा दाराजवळ बसून अभ्यास करू नये. यामुळे एकाग्रता साधता येत नाही.
2. ब्राह्मी बूटी गळ्यात धारण केल्यास स्मरणशक्ती वाढते. अभ्यासात एकाग्रताही राहते.
3. आपल्या अभ्यासाच्या खाेलीत हिरव्या पडद्यांचा वापर करावा.
4. खाताना-पिताना अभ्यास करू नये.
5. एखाद्या पुस्तकाचा अभ्यास करण्यापूर्वी ते आपल्या कपाळाला लावावे. मळ्नया हातांनी पुस्तक हाताळू नये तसेच ते खराब जागी ठेवू नये. पुस्तकांच्या देखभालीकडे व सफाईकडे पूर्ण लक्ष द्यावे. काही काळ पुस्तके उन्हात ठेवावीत.
विशेषत: सकाळचे ऊन लाभदायक असते. सूर्यप्रकाशात व उघड्या जागी अभ्यास केल्यास लवकर विषयांत पारंगत हाेता येते.
6. जर स्टडीरूम वेगळी नसेल तर सामूहिक वर्गात पूर्वेकडे ताेंड करून अशाप्रकारे बसावे की, ताेंड समाेर भिंतीकडे राहील. काेपऱ्यात बसणे टाळावे.
7. विद्यार्थ्यांनी आपले कान केसांनी झाकू नयेत.
8. जर अभ्यासात एकाग्रता कमी असेल तर नवग्रहांच्या रंगांनुसार नऊ खडे हिरव्या वस्त्रात बांधून विद्यार्थ्याने आपल्या स्टडीरूममध्ये ठेवावेत व दर बुधवारी ते पाहून पुन्हा बांधून ठेवावेत.
9. रूममध्ये पूर्व दिशेला सरस्वतीमातेचे चित्र लावावे. सरस्वती मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र- ॐ ऱ्हीं एें ऱ्हीं ॐ सरस्वतेय नम: 10. अध्ययनकक्षात टेबलावर खेळण्याचे सामान, बुद्धिबळ, पत्ते इ. ठेवू व खेळू नयेत.