हिऱ्यापासून प्रेरणा घेऊन बनविली 361 फूट लांब याॅट

06 Aug 2022 14:39:41
 
 
 

Yat 
एका दुर्मीळ हिऱ्यापासून प्रेरणा घेऊन एका जहाज कंपनीने ल्नझरी सुपर याॅट तयार केली आहे. हा दुर्मीळ हिरा कार्टियर नावाच्या इसमाच्या मालकीचा असून, ताे 128 कॅरेटचा आहे. या हिऱ्याचे नाव स्टेला डेल सुड असून, ल्नझरी याॅटला हेच नाव देण्यात आले आहे.361 फूट लांबीच्या या याॅटमध्ये तीन प्रशस्त चित्रपट गृहे, तीन स्वीमिंग पूल आणि एक हेलिपॅडसुद्धा आहे. या याॅटचे संपूर्ण डिझाइन इटालियन स्टुडिओचा आर्किटे्नट गॅब्रियल टेरुजीने तयार केले आहे. या याॅटला एक चमकदार हिरा जडविला आहे.
या याॅटच्या लाऊंजमध्ये बसून सनबाथ घेता येते. या याॅटमध्ये मालकासाठी स्वतंत्र स्युट आहे. ज्याला प्रवास करता करत काम करायचे असेल त्याच्यासाठी ‘प्रायव्हेट ऑफिस’ आहे. आठ व्हीआयपी केबिन आहेत. याशिवाय मसाज रूम, जिम, साेनाबाथ आणि स्टीम रूमसुद्धा आहे. हा स्वीमिंग पूल धबधब्याचा आभास निर्माण करताे. अशा या अत्याधुनिक ल्नझरी याॅटची किंमत 418 मिलियन पाैंड (40 अब्ज रु.) आहे.
Powered By Sangraha 9.0