डास पळवून लावण्यास माेबाइल अ‍ॅपचा वापर

06 Aug 2022 14:28:28
 
 


Mosquito
 
सध्या माेबाइलमधील एक अ‍ॅप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही डास पळवून लावू शकता.सध्या पावसाळा असून, ठिकठिकाणी पाणी साचतं. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास माेठ्या प्रमाणात हाेते. तसेच माेठ्या प्रमाणात मलेरिया, डेंग्यू या सारखे आजार पसरतात. त्यामुळे घरात डास असले, की धडकी भरते. आता डासांची चिंता न करता तुमच्या माेबाइलमध्ये डास पळवून लावणारं अ‍ॅप डाऊनलाेड करा. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टाेर आणि अ‍ॅपल स्टाेरवर उपलब्ध आहे. डास पळवून लावणारे सर्व अ‍ॅप एकसारखेच काम करतात. अ‍ॅप डेव्हलपरने दावा केला आहे की, हे अ‍ॅप ऑन करताच डास आसपास फिरकणार नाहीत.हे अ‍ॅप लाे फ्रिक्वेंसी साउंड्स प्राेड्यूस करते.यामुळे डास पळून जातात.
 
या अ‍ॅपमध्ये लाे फ्रिक्वेंसी अल्ट्रासाेनिक साउंड पर्याय निवडू शकता. या आवाजाची तीव्रता कमी असल्याचा दावा अ‍ॅप करतात. पण खरंच हे अ‍ॅप डास पळवून लावतात का? चला तर मग याबाबत जाणून घेऊयात खरं तर हे अ‍ॅप तितके प्रभावी नसल्याचा दावा अनेक वापरकर्त्यांनी केला आहे.तसेच आवाजाबाबतही तक्रार केली आहे. हे अ‍ॅप सुरू केल्यानंतर अनेक जाहिराती पाॅपअप हाेतात. त्यामुळे डासांच्या त्रासासाेबत न आवडणाऱ्या जाहिरातीही पाहाव्या लागतात. त्यामुळे हे अ‍ॅप फक्त जाहिरातींसाठी बनवले असल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे डेव्हलपरला चांगलं उत्पन्न मिळतं. असे अ‍ॅप ऑथेंटिक आहे की नाही, हा प्रश्नही असताे. याचा फायदा घेऊन स्कॅमर मालवेअर फाेनमध्ये इन्स्टाॅल करू शकतात.
Powered By Sangraha 9.0