लाेकलच्या तिकिटासाठीही एकच सामायिक कार्ड याेजना

    06-Aug-2022
Total Views |
 
 
सप्टेंबरमध्ये निविदा काढणार : एमआरव्हीसी, मध्य व पश्चिम रेल्वेच्या बैठकीत निर्णय
 

Local 
 
बेस्टनंतर आता मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरही एकच सामायिक कार्ड (नॅशनल काॅमन माेबिलिटी कार्ड) सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुढील वर्षी त्याची अंमलबजावणी हाेणार असून, त्यासाठी सप्टेंबरमध्ये निविदा काढण्यात येतील. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तिकीट, पास काढताना राेख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्टने नुकतीच एकच सामायिक कार्डची सेवा सुरू केली आहे.मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवाशांसाठीही बेस्टप्रमाणे एकच सामायिक कार्ड यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी एमआरव्हीसी प्रयत्नशील आहे. उपनगरीय रेल्वेचा आवाका माेठा आहे. राेज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही सुमारे 65 लाखांहून अधिक आहे.
 
त्यामुळे सामायिक कार्डची अंमलबजावणी नेमकी कशी करावी, यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यंत्रणा राबवण्यासाठी बँकांसाेबतही चर्चा सुरू आहे. यासंदर्भात एमआरव्हीसी, मध्य आणि पश्चिम रेल्वेची नुकतीच बैठक झाली.त्यावेळी एकच सामायिक कार्ड याेजनेच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रवेशद्वारांवर कार्डरीडर बसवल्यास रांगा लागण्याची शक्यता, तिकीट तपासनीसांचे मनुष्यबळ आणि उपलब्धता, त्यांना लागणाऱ्या उपकरणांसह अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. ही सेवा उपलब्ध करून देतानाच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर मिळणारी सेवा, एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट आरक्षण सेवा मात्र कायम राहणार आहेत.
 
एकच सामायिक कार्ड’ची अंमलबजावणी, त्यातील तांत्रिक मुद्दे यावर चर्चा करण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्याअधिकाऱ्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. या सेवेची अंमलबजावणी 2023 पासून टप्प्याटप्प्यात केली जाईल.ती 2024 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये निविदा काढली जाणार असल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितले.या याेजनेनुसार सर्व रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर कार्डरीडर बसवण्यात येणार आहे. प्रवास करणाऱ्यांना कार्डरीडरवर कार्ड टॅप करावे लागेल आणि घेतलेल्या प्रवासानुसार कार्डमधून पैसे वजा हाेतील आणि प्रवाशाला तिकीट मिळेल.प्रवाशाकडील तिकीट तपासण्यासाठी तिकीट तपासनीसांना उपकरणे दिली जातील