किराणा दुकानदार महिलेने बचतीचे पैसे साठवून 11 देशांचा दाैरा केला

    06-Aug-2022
Total Views |


Kirana
एर्नाकुलम तिरुवनकुल येथे छाेटेसे किराणा दुकान चालविणाऱ्या माैली जाॅय नावाच्या महिलेने बचत करून तब्बल 11 देशांचा दाैरा करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे माैली जाॅयने कधी शाळेच्या ट्रिपमध्येही भाग घेतला नव्हता.माैली फ्नत दहावी शिकलेली आहे.तिचा विवाह चित्रपुझा येथील तरुणासाेबत झाला. घरखर्च भागविण्यासाठी माैली व तिच्या पतीने एक छाेटेसे किराणा दुकान सुरू केले. माैलीला गावाेगाव फिरण्याची आवड हाेती. पण, परदेशात जायला मिळेल याचा तिने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता.
2004 मध्ये माैलीच्या पतीचा अचानक मृत्यू झाला. माैलीला 18 व 20 वर्षांची दाेन मुले आहेत. हे दाेघेही शिकत आहेत.
 
माैली एकटीच किराणा दुकान सांभाळू लागली. मुलीचा विवाह लावून दिला. ती सुरुवातीला तिची मैत्रीण मेरीसाेबत पलानी, मदुराई, उटी, काेडाइकनाल, म्हैसूर, काेवलम आदी शहरे फिरून आली. मेरी युराेपला जाऊन आली हाेती. त्यामुळे ती माैलीला युराेपच्या गाेष्टी सांगत असे. त्यामुळे माैलीलासुद्धा परदेशात जाण्याची इच्छा झाली. तिच्या मुलाने व मुलीने तिला प्राेत्साहन दिले व तिने घरखर्च वजा जाता परदेशात जाण्यासाठी बचत करण्यास सुरुवात केली.इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनीला जाण्यासाठी पासपाेर्ट बनवून घेतला. पुरेसे पैसे साठल्यानंतर 11 देशांत जाऊन आली. लासवेगास, नायगरा धबधबा आणि युनिव्हर्सल स्टुडिओ तिला खूपच आवडला.