संगीताची जाण समृद्ध करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त : राज्यपाल

    06-Aug-2022
Total Views |
 
 
 

Governor 
 
संगीत हे ईश्वरासाेबत जाेडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून, त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बाैद्धिक विकास साधण्यासाठी संगीताची गाेडी निर्माण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिक महात्म्य रागरंजन या पुस्तकात अंतर्भूत असून, या क्षेत्रात कारकीर्द घडवणाऱ्यांसाठी रागरंजन हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथे केले.
 
डाॅ. तनुजा नाफडे लिखित ‘रागरंजन’ या पुस्तकाचे राजभवनच्या दरबार सभागृहात राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्याप्रसंगी राज्यपाल बाेलत हाेते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी, ओम साई पब्लिकेशनचे प्रमुख तथा प्रकाशक गणेश राऊत यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित हाेते. संगीत क्षेत्रातील अनुभव, बालपणापासूनची साधना, शास्त्रीय संगीतातील बारकावे, व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी संगीताचे महत्त्व, त्या माध्यमातून उपचार यासंबंधी डाॅ. नाफडे यांनी मनाेगत व्यक्त करताना सांगितले. व्ही. शांता कुमारी यांनीही मनाेगत व्यक्त केले.