गणेश विसर्जनासाठी यंदा फिरते कृत्रिम तलाव

    06-Aug-2022
Total Views |
 
 
वसई-विरार पालिकेचा निर्णय : मूर्ती दानाचेही नागरिकांना आवाहन
 

Ganesh 
 
गणेश विसर्जनादरम्यान शहरातील तलावांतील प्रदूषण राेखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदा अनाेखा प्रयाेग करण्याचे ठरवले आहे. फिरत्या कृत्रिम तलावांद्वारे नागरिकांना विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबराेबरच शहरातील तलावांच्या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती संकलित करून त्या शहरातील दगडखाणीत विसर्जित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यंदा गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा हाेणार आहे. शहरातील तलावांचे सुभाेभीकरण, साफसफाई पालिका दरवर्षी करते. तथापि, विसर्जनामुळे तलाव अस्वच्छ हाेतात. ते राेखण्यासाठी यंदा पालिकेने त्रिस्तरीय याेजना तयार केली आहे.शहरात विसर्जनासाठी एकूण 20 तलाव आहेत. नागरिकांना मूर्ती विसर्जन करणे साेपे जावे, यासाठी पालिका यंदा फिरते कृत्रिम तलाव तयार करणार आहे.
 
तलावांत विसर्जनासाठी आलेल्या शाडूच्या मूर्ती या कृत्रिम तलावांत विसर्जित केल्या जातील, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पालिका जमा करणार असून, या मूर्ती शहरातील पाच माेठ्या दगडखाणीतील पाण्यात विसर्जित करणार आहे. 4 फुटांच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि दगडखाणीत, तर 4 फुटावरील मूर्तींचे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. तसेच, यंदा पालिका मूर्ती दान करण्याचे आवाहन करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भाविक सामाजिक भान जपत शाडूच्या आणि लहान मूर्ती आणतात. विसर्जनासाठी जाताना मिरवणूक काढतात.
 
त्यामुळे वाहतूककाेंडी आणि ध्वनिप्रदूषण हाेते. हे राेखण्यासाठी फिरते कृत्रिम तलाव करून नागरिकांच्या दारात नेले जाणार आहेत.
एका माेठ्या ट्रक किंवा टेम्पाेत हाैद ठेवण्यात येईल आणि हा ट्रक प्रत्येक विभागात फिरत राहील. नागरिकांनी विसर्जन मिरवणूक न काढता या ट्रकमधील हाैदात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, अस आवाहन पालिकेने केले आहे.प्रदूषण राेखण्यासाठी आम्ही हा प्रयाेग राबवत असून, काेणत्याही प्रकारे परंपरा आणि धार्मिक भावना दुखावली जाणार नाही. त्यामुळे सणाचे पावित्र्य अबाधित राहून हा सण अधिक मंगलमय हाेणार आहे. सुजाण नागरिक सकारात्मकतेने या प्रयाेगाचे स्वागत करून प्रदूषण राेखण्यासाठी हातभार लावतील, अशी आशा आहे. पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केली.