रुग्णाच्या पाेटातून काढली एक रुपयाची 63 नाणी

    06-Aug-2022
Total Views |
 
 

Coins 
 
येथील मथुरा दास माथुर रुग्णालयातील शल्यविशारदांनी शस्त्रक्रिया करून एका रुग्णाच्या पाेटातून तब्बल 63 नाणी बाहेर काढली. दाेन दिवस ही शस्त्रक्रिया सुरू हाेती.नैराश्याच्या भरात या रुग्णाने ही नाणी गिळल्याचे सामाेरे आले. या रुग्णाचे वय 36 वर्षे असून, पाेटात तीव्र वेदना हाेत असल्यामुळे त्याला रुग्णालयात आणण्यात आले हाेते. ‘आपण 10-15 नाणी गिळल्याचे हा रुग्ण सांगत हाेता.
पण, त्याची क्ष-किरण तपासणी केली तेव्हा त्याच्या पाेटात नाण्यांचा ढीगच दिसला,’ अशी माहिती रुग्णालयाचे डाॅ. नरेंद्र भार्गव यांनी दिली. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शल्यविशारदांनी एण्डाेस्काेपी तंत्राचा वापर करून ही नाणी बाहेर काढायला प्रारंभ केला.
रुग्णाच्या पाेटातून एक रुपयाची 63 नाणी बाहेर काढण्यात आली, असे त्यांनी सांगितले. ‘बाॅर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ (बीपीडी) या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये नाणी गिळण्याची सवय आढळत असल्याचे डाॅ. भार्गव यांनी नमूद केले. या रुग्णाची प्रकृती आता बरी असली, तरी त्याला मानसाेपचारतज्ज्ञांकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.