लाेहमार्ग पाेलिसांच्या सतर्कतेमुळे नागपुरात 190 मुले परतली घरी

    05-Aug-2022
Total Views |

Lohmarg
काेराेनात घर साेडणाऱ्यांची संख्या लक्षणीय काेणत्या ना काेणत्या कारणाने घरून निघून गेलेली 190 मुले लाेहमार्ग पाेलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आपल्या घरी परतू शकली आहेत. 2021 ते 2022 या काळात ही मुले आढळली असून, यात 98 मुले व 92 मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये काेराेनाच्या काळात रागाच्या भरात घरातून निघून जाणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय हाेती.
आई-वडील रागावले म्हणून मुले घरून निघून गेल्याच्या घटना अनेकदा घडतात. एखाद्या आमिषामुलेही मुले घरातून निघून जातात.
अशा वेगवेगळ्या कारणांनी घराबाहेर पडणारी ही मुले समाजविघातक प्रवृत्तींच्या हाती लागण्याची शक्यता असते.
 
त्यामुळेच रेल्वे स्थानकांवर, तसेच गाड्यांमध्येही आरपीएफ व लाेहमार्ग पाेलिस नजर ठेवून असतात.पालक किंवा काेणी माेठी व्यक्ती नसलेली मुले आढळली, तर लगेच त्यांची चाैकशी करण्यात येते आणि ती घरून निघालेली असतील, तर त्यांचे समुपदेशन केले जाते.नागपूर लाेहमार्ग पाेलिस क्षेत्रात गेल्या वर्षी पाेलिसांमार्फत 12 मुले व 6 मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, तर बालकल्याण समितीमार्फत 65 मुले व 57 मुलींना घरी पाठवण्यात आले. तिघांना बालगृहात दाखल करण्यात आले. या वर्षी आतापर्यंत पाेलिसांद्वारे सहा मुले आणि तेरा मुलींना त्यांच्या कुटुंबाकडे साेपवण्यात आले आहे.