व्हिडीओ काॅलवर अनाेळखी व्य्नतींशी बाेलल्याने 25 लाख रुपयांना गंडा

    05-Aug-2022
Total Views |
 
 

fruad 
अनाेळखी लाेकांशी व्हाॅट्सअ‍ॅपवर बाेलणं किंवा त्यांच्याशी व्हिडीओ काॅल करत गप्पा मारणं किती धाेकादायक असतं, याचा प्रत्यय एका तरुण इंजिनीअरला आला आहे. कारण व्हाॅट्सअ‍ॅपवर व्हिडीओ काॅल करून अश्लील चाळे करणाऱ्या एका तरुणाला आराेपींनी तब्बल 25 लाख रुपयांना चुना लावला आहे. ही घटना ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये घडली.पेशाने इंजिनीअर असलेला एक तरुण भुवनेश्वरमध्ये भारत संचार निगम लिमिटेड (इडछङ) मध्ये काम करताे. त्याला काही अनाेळखी लाेकांकडून व्हाॅट्सअ‍ॅपवर व्हिडीओ काॅल्स आले हाेते. त्याला त्यानं प्रतिसाद दिल्यानं ताे फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात सहज अडकला.
 
आराेपींनी तरुणाला ब्लॅकमेल करून 25 लाखांचा चुना लावला.आराेपींच्या टाेळीनं इंजिनीअरला एक मेसेज सेंड केला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा न्यूड व्हिडीओ काढण्याचा प्लॅन आराेपींनी केला हाेता.त्याचा व्हिडीओ काढल्यानंतर आराेपींनी सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत पीडित इंजिनीअरला ब्लॅकमेल करून त्याच्या खात्यातून 25 लाख रुपये उकळले.या सगळ्या प्रकाराविराेधात पीडित इंजिनीअर तरुणानं पाेलिसांमध्ये तक्रार दिली असून, त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ताे ज्या लाेकांशी व्हाॅट्सअ‍ॅप व्हिडीओ काॅलवर बाेलला हाेता, त्यातल्या एकालाही ताे ओळखत नसल्याचं सांगितलं आहे.
 
याशिवाय मला व्हिडीओ काॅल आल्यानंतर मी तात्काळ ताे व्हिडीओ काॅल डिस्कनेक्ट केल्याचं तरुणानं सांगितलं आहे.त्यानंतर आराेपींनी तरुणाच्या चेहऱ्याचा स्क्रिनशाॅट घेऊन एडीट करून त्याचा अश्लील व्हिडीओ तयार केला आणि तरुणाला सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत 25 लाखांचा गंडा घातला. तरुणानं पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पाेलिसांकडून कारवाई केली जात आहे.