पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाची सत्यनारायण पूजा संपन्न

    05-Aug-2022
Total Views |
 
vikreta
 
पुणे, 4 ऑगस्ट (आ.प्र.)
 
 पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अप्पा बळवंत चौक विभागाच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात पूजा संपन्न झाली. विभागातील विक्रेते बंधू प्रदीप जगताप चार वर्षे कॅन्सरग्रस्त असल्याने अप्पा बळवंत चौक विभागातील विक्रेते बंधू, सेंटरचालक, वृत्तपत्र वितरण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पारगे यांनी एकत्रित मिळून वीस हजार रुपये जगताप यांना उपचारासाठी मदत म्हणून सुपूर्त केले. त्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले, विश्‍वस्त संदीप शिंदे तसेच संघटनेचे विश्‍वस्त, विभागप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते धीरज घाटे व नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचीही उपस्थिती होती. अप्पा बळवंत चौक विभागातील अध्यक्ष चंदन कोऱ्हाळकर, विभागप्रमुख शाम धायगावे, प्रमोद बलकवडे, पुणे शहर संघटक गिरीश नगरकर, विभागीय कार्यकारिणीचे महेश मेथे, महेंद्र मोटे, यशवंत बोगम, पोपटराव गायकवाड, बाळासाहेब ढमाले, विजय जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.