नाशिकमधील धरण साठा 84 ट्न्नयांवर

    05-Aug-2022
Total Views |
 
 

Water 
गाेदावरीतून 47 टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहित पावसाचा लपंडाव सुरू असताना ऑगस्टच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब भरलेली असून, उर्वरित पाच धरणेही भरण्याच्या स्थितीत आहेत. दारणा आणि गंगापूरसारख्या माेठ्या व मध्यम धरणांत जलाशय परिचालन सूचीतील वेळापत्रकानुसार जलसाठा करावा लागल्याने मुसळधार पाऊस हाेऊनही ती पूर्ण क्षमतेने भरता आली नाहीत.जिल्ह्यात सध्या 55161 दशलक्ष घनफूट म्हणजे 84 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातून 47 टीएमसी पाणी गाेदावरीतून जायकवाडी धरणाकडे प्रवाहित झाले आहे.जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावलेल्या पावसाने जुलैत सर्व कसर भरून काढली.10 ते 15 दिवसांत झालेल्या पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला. अनेक तालुके जलमय झाले. अवघ्या काही दिवसांत बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आली.
 
पावसाचा जाेर नंतर कमी झाला. तूर्तास ताे अधूनमधून हजेरी लावताे. पावसाला अद्याप दाेन महिने अवधी आहे. तत्पूर्वीच जलसाठा लक्षणीयरीत्या उंचावला आहे. आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भाेजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. गाैतमी गाेदावरी (84), काश्यपी (94 टक्के), करंजवण (81), मुकणे (91) व गिरणा (90) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 74 टक्के, दारणात 74 व पालखेड धरणात 54 टक्के साठा झाला आहे.करंजवण (81), पुणेगाव (75), कडवा (85), नांदूरमध्यमेश्वर (82), चणकापूर (62), पुनद (46), नागासाक्या (10) असा जलसाठा आहे. माणिकपूंज हे एकमेव धरण अद्याप काेरडेठाक आहे.