जास्त हसणे वा रडण्याने नताशाला मृत्यूचा धाेका

    05-Aug-2022
Total Views |

Natasha
जास्त हसणे वा रडण्याने नताशाला मृत्यूचा धाेका इंग्लंडच्या नाॅटिंगहॅम शहराची रहिवासी 27 वर्षीय नताशाला ‘मास्ट सेलअ‍ॅ्निटव्हेशन सिन्ड्राेम’ नावाचा विचित्र आजार झाला आहे. जास्त हसल्याने वा रडल्याने तिला आतापर्यंत तब्बल 500 वेळा दवाखान्यात दाखल व्हावे लागले.या विचित्र आजारामुळे नताशा ज्यावेळी इमाेशनल हाेते तेव्हा तिला हसू येते, घाम येताे व डाेळ्यातून अश्रूही वाहू लागतात. त्यामुळे तिच्या शरीरावर चट्टे पडतात. अशा स्थितीत ती दवाखान्यात दाखल झाली नाही, तर तिचा मृत्यू हाेण्याचा धाेका असल्याचे डाॅ्नटरांनी सांगितले.