नाेंदणीकृत पथकांना अर्ज करण्याचे आवाहन
गेल्या दाेन वर्षांच्या काेराेना संकटानंतर यंदा गाेपाळकाला उत्सव माेठ्या उत्साहात साजरा हाेणार आहे. या दहीहंडी उत्सवात गाेविंदा पथकांची जाेखीम व धाेका लक्षात घेऊन वसईविरार महापालिकेने गाेविंदा पथकांना माेफत विमा याेजना सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर गाेपाळकाल्याचा सण आल्याने शहरातील गाेविंदा पथकांनी सराव करण्यास सुरुवात केली आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील गाेविंदांना रुग्णालयाचा खर्च करणे परवडत नाही. अशा काही बाबी विचारात घेत वसई विरार महापालिकेने 2015 पासून गाेविंदांसाठी माेफत अपघात विमा याेजना सुरू केली आहे. गेली दाेन वर्षे काेराेनामुळे ही याेजना बंद हाेती. मात्र, यंदा दहीहंडी उत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गाेविंदांसाठी अपघात विमा याेजना पालिकेने सुरू केली आहे.
या विमा याेजनेत नाेंदणीकृत गाेविंदा पथकांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना पथकात सहभागी असलेल्या प्रत्येक गाेविंदाचे आधारकार्ड व संपर्क क्रमांक द्यावा लागणार आहे. 16 ऑगस्टपर्यंत गाेविंदा पथकांना या विमा याेजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. विमा कंपनीमार्फत विमा उतरवून झाल्यानंतर काेणकाेणत्या रुग्णालयात उपचार केले जातील याची यादीही दिली जाणार आहे.पालिका हद्दीतील गाेविंदा पथकांनी पालिकेशी संपर्क साधून पथकात समाविष्ट गाेविंदांचा विमा काढावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.ज्या दिवशी विम्याची नाेंद हाेईल, त्या दिवसापासून ते 20 ऑगस्टच्या पहाटे 6 पर्यंत विम्याचे संरक्षण गाेविंदांना मिळेल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. याआधीच्या वर्षी 77 गाेविंदा पथकाच्या 4627 गाेविंदांचा विमा उतरवण्यात आला हाेता.