मुलांना प्रेमाने समजावून सांगा, ते समजून घेतात

    05-Aug-2022
Total Views |
 

childrens 
अनेक पालक मुलांशी वागताना त्यांना सतत रागावतात. असं करू नकाेस, तसं करू नकाेस, हे का केलंस, हं चुकीचं केलंस असंच त्यांना उपदेश देतात.मुलांना ‘चुका करू नये’ असं रागावून नाही, तर असं का करू नये, हे समजावून सांगायचं असतं. एकदा त्यांना कारण कळलं की ती चूक ते पुन्हा करणार नाही.मुलांना लहान समजून त्यांना घालूनपाडून बाेलणे किंवा सतत रागावणे, त्याच्यातील कमरता दाखवणे अशा पद्धतीने अनेक पालक मुलांशी वागतात. तुम्ही सहज म्हणून मुलांशी जे बाेलता, जसं वागता, ते मुलांच्या मनावर खाेलवर रुजतं. त्यामुळे मुलांशी बाेलताना काही गाेष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुलांचा सन्मान जपा, त्याच्याशी आदराने वागा. असं तुम्ही आपल्या मुलांशी वागलात, तर तुमच्या मुलात सकारात्मक बदल घडून येईल. तुम्ही त्यांच्याशी सन्मानाने वागल्यास तेही तुमच्याशी सन्मानाने वागतील.
 
नेहमी तणावपूर्ण वातावरणात राहणारी मुलं प्रेमाने वागवणारं आपलं माणूस शाेधत असतात.मुलांना स्वतंत्रपणे बागडू द्या.मुलांच्या विकासासाठी महत्त्वाच्या गाेष्टी नवीन पद्धतीने शिकवल्यास मुलं ते आनंदाने स्वीकारतात.मुलांना पुस्तकी किडा बनवू नका, त्यांना अवांतर गाेष्टीचेही ज्ञान द्या. शांत, समृद्ध व मूल्य जपणारी मुलं घडवा.एखादं काम मुलांना मुद्दाम करायला लावा. यातून त्यांना श्रमाचं महत्त्व कळतं, तसेच त्यामुळे त्यांना जबाबदारीचीही जाणीव हाेते.पालकांनी मुलांना वेळ देणं महत्त्वाचं असते.पालकांचा सहवास मुलांना ुलण्यास मदत करताे.कारण पालकांच्या सहवासात मूल जास्त आनंदी राहतं.मुलांना दाेष देण्याआधी स्वत:कडे बघा, तुम्ही मुलांसमाेर कसे वागता.