ब्रेनट्यूमरची लक्षणे

    05-Aug-2022
Total Views |
 
 

Brain Tumor 
शंका : मला डाेकेदुखीसाेबत कान, डाेळे, व नाकातही वेदना हाेतात. उलटीची लक्षणेही असतात.मायग्रेनशिवाय हे इतर काेणत्या आजाराचे लक्षण असू शकते?
 
उत्तर : हे लक्षण ब्रेन ट्यूमरचेही असू शकते. जर वेदना कधी कधी हाेत असतील वा ही समस्या दीर्घकाळा पासून असेल तर हे मायग्रेन असण्याची श्नयता जास्त आहे, पण अचानक खूप तीव्र दुखत असेल, वारंवार हाेत असेल वा त्यासाेबत धूसर दिसत असेल, हात वा पायातही त्रास असेल आणि खूप जास्त उलट्या हाेत असतील तर हे इतर एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते. पण, आपण स्वत: काहीही ठरवू नये व उत्तम डाॅ्नटरांना दाखवावे. मायग्रेन मॅनेज करण्याकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम करावा.वेळेवर व समताेल आहार घ्यावा.जंकफूड व कॅफीनयुक्त पदार्थ कमी खावे-प्यावेत. जर मायग्रेनच्या वेदना महिन्यात चार वेळेपेक्षा जास्त हाेत असतील तर उत्तम न्यूराेलाॅजिस्टला भेटावे. औषधाचीही गरज पडू शकते.