मालदीवच्या अध्यक्षांची मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट

    05-Aug-2022
Total Views |
 

Bombay 
 
संचालकांशी साधला संवाद : बाजारातील यंत्रणांची केली पाहण मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम माेहमद सालेह यांनी मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली. मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष एस.एस. मुंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
मुंबई शेअर बाजाराच्या संचालकांसमवेत अध्यक्ष सालेह यांनी चहापान केल्यानंतर बाजारातील नेटवर्क ऑपरेशन सेंटर आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची पाहणी केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हाॅलमध्ये येऊन प्रातिनिधिक स्वरुपात घंटा वाजवली.
 
संचालकांच्या द बिग बुल या कांस्य शिल्पाचे स्मृतिचिन्ह आणि बीएसई- टेंपल ऑफ वेल्थ क्रिएशन हे काॅफी टेबल बुक सालेह यांना भेट देण्यात आले.मुंबई शेअर बाजार हे देशातील पहिले आणि सर्वात माेठे सिक्युरिटीज मार्केट आहे. 1875मध्ये नेटिव्ह शेअर आणि स्टाॅक ब्राेकर्स असाेसिएशन म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. आज जगातील सर्वात माेठ्या शेअर बाजारांपैकी एक म्हणून त्याची गणना हाेते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मालदीवचे अध्यक्ष सालेह आले हाेते, अशी माहिती मुंद्रा यांनी दिली.