सापुतारा येथे आहेत एकाच ठिकाणी 8 धबधबे

    04-Aug-2022
Total Views |
 
 
 

waterfall 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे दरवर्षी कमी पाऊस पडत असलेल्या विदर्भ-मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात नदी-नालेच नव्हे तर धबधबेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. हे धबधबे पाहायला लाेकांच गर्दी उसळत आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबार येथून काही अंतरावर गुजरातमधील सापुतारा येथे एकाच ठिकाणी 7-8 धबधबे ओसंडून वाहत आहेत. हे धबधबे डांग जिल्ह्यातील सापुतारापासून 50 कि.मी. व वघई येथून 4 किलाेमीटर दूर 7-8 धबधबे ओसंडून वाहत आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी दूरदुरून माेठ्या संख्येने पर्यटक येतात.यावर्षी हे विलाेभनीय धबधबे पाहण्यासाठी लाेकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.