स्पेनचे जहाज 1656मध्ये बहामाजवळ बुडाले हाेते; खजिन्याचा शाेध सुरू हाेता
बहामाच्या समुद्रात बुडालेल्या जहाजावरील खजिन्यातील काही वस्तू 366 वर्षांनंतर नुकत्याच सापडल्या आहेत. स्पेनचे हे जहाज 1656मध्ये बुडाले हाेते.‘न्यूएस्त्रा सिनाेरा डी लास माराव्हिलास’ ( (Nuestra Senora de las Maravillas) असे या जहाजाचे नाव असून, इंग्लिशमध्ये त्याचा उल्लेख ‘अवर लेडी ऑफ वंडर्स’ ( (Our Lady of Wonders)) असा केला जाताे. त्या काळात खवळलेल्या समुद्रात जहाजे बुडणे ही नित्याची घटना हाेती. साेन्यासह अन्य माैल्यवान खजिना घेऊन निघालेले हे जहाज 1656मध्ये बहामाजवळ बुडाले. मात्र, ते नक्की काेठे बुडाले याची निश्चित माहिती नसल्यामुळे त्यावरील खजिना शाेधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता लिट्ल बहामाच्या किनारपट्टीवर या खजिन्यातील काही वस्तू सापडल्या असून, समुद्रतळाशी तेरा किलाेमीटरच्या परिसरात त्या विखुरलेल्या आहेत. यात रत्नजडित पेंडंट्स आणि साेनसाखळ्यांचा समावेश आहे.
‘न्यूएस्त्रा सिनाेरा डी लास माराव्हिलास’च्या शाेधासाठी ‘अॅलन ए्नस्प्लाेरेशन’ या कंपनीने काम केले.त्यांना सागरी तज्ज्ञ आणि बहामा तसेच अमेरिकेतील पाणबुड्यांनी मदत केली. बहामाच्या सरकारनेही सहकार्य केले. सापडलेल्या या वस्तू फ्रीपाेर्ट शहरातील सागरी संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत.‘पाचू आणि साेन्याची पेंडंट पाहिल्यावर माझा श्वासच अडकला हाेता. त्यांचे ऐतिहासिक मूल्य फार माेठे आहे. बहामाच्याखवळलेल्या समुद्रात ही नाजूक पेंडंट एवढी वर्षे सुरक्षित कशी राहिली आणि ती आम्हाला कशी सापडली याचेच आश्चर्य वाटते,’ अशी प्रतिक्रिया ‘अॅलन ए्नस्प्लाेरेशन’चे संस्थापक कार्ल अॅलन यांनी बाेलताना व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे एवढ्या वर्षांनंतर हा खजिना सापडल्याचे ते म्हणाले.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ्नयुबातील हॅवाना बंदरातून हे जहाज स्पेनकडे निघाले हाेते. त्यावर माैल्यवान खजिनाहाेता. बहामाजवळ समुद्रातील खडकावर आदळून ते फुटले आणि बुडाले. आता 366 वर्षांनंतर त्यावरील खजिन्यातील काही वस्तू मिळविण्यात यश आले आहे.