पावसाळ्यात तुमचा आहार कसा असावा?

    04-Aug-2022
Total Views |
 
 
 
Monsoon
 
क जीवनसत्त्व घ्या : आहारातील क जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवा. संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी आणि राेगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हे साहाय्यक ठरते. यामुळे सर्दी-खाेकला आणि तापापासून संरक्षण हाेते. लिंबाचं सेवन करणे अधिक उत्तम.
 
पाणी पित राहा : पावसाळ्याच्या दिवसात तहान कमी लागते. यामुळे आपण शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिण्यापासून वंचित राहाताे. ज्यामुळे अनेकदा डिहायड्रेशनची स्थिती निर्माण हाेते.तसंच यामुळे इतरही समस्या निर्माण हाेतात. म्हणून जरी तहान लागली नाही, तरी थाेड्या थाेड्या वेळाने थाेडं पाणी अवश्य प्या.
 
कडवट पदार्थांचं सेवन अधिक करा : पावसाळ्यात कारल्याचे सेवन अधिकाधिक करा. दरराेज कडूलिंबाची एक-दाेन काेवळी पानं खाणंही ायदेशीर ठरते. कडवट पदार्थ राेगप्रतिकारक क्षमता वाढवतात, ज्यामुळे सर्दी-खाेकल्यापासून बचाव हाेताे. थाेडासा सर्दी-खाेकला झाल्यानंतर महासुदर्शन चूर्ण किंवा काढा अवश्य घ्या. यामुळे राेगप्रतिकारक क्षमता वाढते.
 
हर्बल टी किंवा ग्रीन टी प्या : जस्मिन किंवा ग्रीन टी यांसारख्या चहांचा राेजच्या आहारात समावेश करा. जर तुम्हाला हा चहा आवडत नसेल, तर कमीत कमी सकाळच्या चहामध्ये तुळशीची पानं मिसळून, ताे चहा प्या. हा चहा पिण्याने सर्दी-खाेकला किंवा इतर संसर्गापासून बचाव हाेताे.