माेबाइलफोन बँकिंग करताना ही खबरदारी घ्या...

04 Aug 2022 14:33:48
 
 
 

Mobile 
माेबाइलफोन बँकिंग करताना जाेपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत हाेत नाही, ताेपर्यंतफोन बँकिंग टाळावे.माेबाइलवर येणारे बँकेचे सर्व काॅल्स टाळावे.जाे माेबाइल तुम्ही वापरता, ताे घरातील इतरही व्यक्ती वापरत असतील, तर माेबाइल बँकिंगचे अ‍ॅप डाऊनलाेडही करू नका.हाॅटेल, पेट्राेल पंप, माॅल इत्यादी ठिकाणी बिल क्रेडिट, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड द्वारे पैसे भरताना आपण स्वत:च ते स्वॅप करावे.त्याचा पासवर्ड कुणालाही देऊ नये.एखाद्या एटीएम मशीनबाबत शंका निर्माण झाल्यास तेथे व्यवहार करू नये.दर तीन महिन्यांनी पिन नंबर बदला.
 
आर्थिक व्यवहार सायबर कॅे किंवा दुसऱ्यांच्या काॅम्प्युटरवरून करू नये बँकेच्या व्हेरििफकेशनच्या नावाने विचारली जाणारी एटीएम विषयीची माहितीफोनवरून देऊ नये.पासवर्ड असे ठेवा की, जे सहज ओळखायला कठीण राहतील. शक्यताे डेट ऑफ बर्थ, माेबाइल क्रमांकाचे शेवटचे पाच अंक पासवर्ड म्हणून ठेवू नका.डेबिट क्रेडिट कार्डच्याफोटाेकाॅपीची प्रत द्यावयाची असेल अशावेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या.एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटन दाबा. जेणेकरून तुमचा एटीएम पासवर्ड सुरक्षित राहील.
Powered By Sangraha 9.0