अतिविचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडणे शक्य

04 Aug 2022 14:16:38
 
 
सतत विचार करत राहिलात, तर हातून कधीच कृती घडणार नाही
 

Happy 
 
संध्यानंद.काॅम
 
विचार हे माणसाला मिळालेले एक वरदान आहे.त्याच्याविना आपण एक क्षणसुद्धा राहू शकत नाही.एखादा लहान-माेठा निर्णय घेण्यासाठीसुद्धा विचार करावा लागताे. रस्ता ओलांडायचे साधे उदाहरण घ्या. काेठे वाहने कमी आहेत, वाहतूक नियंत्रण दिवा लाल आहे की हिरवा अशा अनेक गाेष्टींचा विचार करून मगच आपण रस्ता ओलांडताे. विचार करणे याेग्य असले, तरी ‘अति सर्वत्र वर्ज्यते’ या तत्त्वानुसार फार विचार करणेसुद्धा धाेकादायक ठरते. निर्णय केल्यावर गरज असते कृतीची.पण विचारांच्या गुंत्यात अडकून राहिलात तर पाऊल पुढे पडणार नाही.मानवी स्वभावातील एक विराेधाभास म्हणजे काल्पनिक चिंता करणे.
 
मग त्यातून भीतिदायक, चिंताजनक विचार निर्माण हाेतात. आणि निर्णय घेणे कठीण हाेऊन बसते. कालांतराने अतिविचारांची सवय लागून कृतीकडे दुर्लक्ष हाेऊ लागते आणि त्यातून समस्या वाढत जातात. तुम्हीही यात असाल, तर सावध व्हायला हवे.अतिविचारांतून बाहेर कसे पडावे या बाबत रेडिओ हाेस्ट, निर्मात्या आणि ‘टू फॅट टू लाऊड टू अ‍ॅम्बिशस’ या पुस्तकाच्या लेखिका देविना काैर यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांचा उपयाेग केलात, तर तुम्हीसुद्धा अतिविचारांच्या सवयीतून बाहेर येऊ शकाल. त्यांच्या काही टिप्स बघा.स्वत:ला जाणून घ्या आपल्या विचारांच्या साेबत राहणे म्हणजे स्वत:ला जाणून घेणे असले, तरी त्यात सदैव गुंतून राहणे धाे्नयाचे असते. गरजेपेक्षा जास्त विचार करणे चांगले नसते.
 
अतिविचार म्हणजे एक प्रकारचे व्यसन असते आणि त्यातून बाहेर पडणे हे एक आव्हान बनते. मात्र, आपले विचार समजून घेतले तर त्यातून बाहेरही येता येईल.आपले विचार काय आहेत आणि आपण त्यात किती गुंतताे हे समजून घेतलेत तर तुम्हाला विचारांचे विश्लेषण करता येऊ लागते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा दिसायला लागताे. सकारात्मक विचारांची सवय केलीत, तर तुमच्यातील आशादायी वृत्तीत वाढ हाेते.भूतकाळ आणि चिंतांचा स्वीकार अनेकदा भीती अथवा चिंतेतून अतिविचार जन्माला येतात. आपला भूतकाळ, त्यात झालेल्या चुका आणि तेव्हा वाटलेली भीती स्वीकारणे हा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. वर्तमान क्षणच खरा असल्याचे सत्य मान्य केले, तर तुमची वाटचाल अतिविचारांतून बाहेर पडण्याकडे सुरू हाेते.भूतकाळ घडून गेलेला असल्यामुळे तेव्हा झालेल्या चुकांबद्दल हळहळून काही साध्य हाेत नाही आणि भविष्यकाळ अनिश्चितअसल्याने आपल्या हाती काही नसते. हे सगळे स्वीकारलेत, तर तुम्ही वर्तमान काळात जगायला शिकाल.
 
तणाव आणि नकारात्मकता दूर करा: आपल्यातील नकारात्मक विचार आणि तणावांमुळे अतिविचारांची सवय जडते. त्यासाठी आधी तणावातून बाहेर पडण्याचा उपाय याेजण्याची गरज आहे. रात्री झाेपण्यापूर्वी केलेल्या ध्यानामुळे तणाव दूर हाेण्यास मदत हाेत असल्याचे आढळले आहे. ध्यान केल्यामुळे मन शांत हाेते. दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा विचार झाेपण्यापूर्वी केलात, तरी तणाव आणि नकारात्मतकता कमी हाेतात. दिवसाची सुरुवात चांगली करणे हा तणावाला दूर ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. याकरिता दिवसभरात केव्हाही पुरेसा व्यायाम करणे आणि ध्यान करणे उपयु्नत ठरते. या दाेन्ही सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
Powered By Sangraha 9.0