मिथुन

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
या आठवड्यात तुम्ही तुमच्या बाेलण्याने एखाद्याला मंत्रमुग्ध करून संबंध वाढवू शकता. तुमच्या वैचारिक समृद्धीत वाढ हाेईल आणि तुमचे मन प्रफुल्लित राहील. तुम्ही एखादे शुभकार्य करण्यास प्रेरित व्हाल. पैशाची याेग्य व्यवस्था करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुम्ही एखादे धार्मिक काम कराल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक करार आणि देवघेव हाेईल.भागीदारीच्या कामकाजात यशाचे याेग आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्यवहार तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाहीत; तसेच हाताखालील व्य्नतींनाही प्रत्येक काम अनेकदा समजवावे लागू शकते. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात दांपत्य जीवनाच्या सुखात कमतरता राहील.तुमच्या रागावण्यामुळे वाद वाढू शकतात. शांत राहून चर्चेच्या माध्यमातून समस्या साेडवण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवनाची स्थिती ्नलेशकारक राहील.सध्या नातेवाइकाला पैसे उसने देणे टाळावे अन्यथा ते बुडू शकतात.
 
आराेग्य : या आठवड्यात मानसिक उलथापालथ दाबण्यासाठी काही कामांत गुंतून राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. विराेधकांकडून तणाव वाढू शकताे. काेणत्याही वादविवादापासून स्वत:ला दूर ठेवा. एकमेकांची निंदा करणे टाळा. शांतपणे मुद्दे साेडवण्याचा प्रयत्न करा.
 
शुभदिनांक : 02, 03, 06
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात वायफळ खर्च टाळा व पैसा वाचवून बचतीवर लक्ष द्या.
 
उपाय : या आठवड्यात गुरुवारी कणकेत हरभराडाळ, गूळ व हळद टाकून गायीला खाण्यास द्या.