कर्क

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
हा आठवडा आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकाेनातून लाभदायक राहील.धनलाभासाेबत दीर्घकाळासाठी पैशाचे नियाेजनही करू शकाल. व्यापारी असाल तर व्यवसाय विस्ताराच्या याेजना बनवू शकाल. शरीर व मनाने तरतरीत राहाल.मित्र व आप्तेष्टांत काळ आनंदात घालवाल. छाेट्या सहलीचा आनंद घ्याल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला पदाेन्नतीची श्नयता दिसून येत आहे. परदेशगमनही हाेऊ शकते. हाताखालील मंडळींच्या मदतीमुळे तुमच्या स्वभावात उत्साहाची भावना दिसू शकते. व्यापाराची सुरुवात करण्यासाठी हा आठवडा लाभदायक ठरेल.
 
नातीगाेती : हा आठवडा जाेडीदारासाेबत परदेशभ्रमणासाठी अनुकूल हाेताना दिसत आहे. याशिवाय मित्रांसाेबत हिंडण्या-फिरण्याची याेजनाही तुमचा आनंद वाढवू शकते. एकंदरीतच हा आठवडा मजामस्ती व आनंद देणारा असेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत नियमितपणे व्यायाम करण्याची गरज आहे. सकाळी अवश्य फिरायला जावे. ज्यामुळे तुमचे स्नायू लवचिक राहू शकतील. तुम्हाला तुमच्या शरीरात तरतरी व टवटवीतपणाचा अनुभव येईल. आराेग्य अधिक उजळू शकते.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात तंबाखू व दारू सेवनाचे राहूच्या दशेमुळे विपरीत परिणाम मिळू शकतात. यासाठी यापासून दूर राहावे.
 
उपाय : या आठवड्यात शनिवारी शनी ग्रहाच्या वस्तू दान करा. काळे उडीद, चामडी बूट, मीठ, सरसू तेल, नील, काळे तीळ, लाेखंडी वस्तू, काळे कपडे इ.शनीच्या प्रतिकूलतेत अनुकूलता लाभेल