कन्या

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
या आठवड्यात तुमच्या विचारांची समृद्धी वाढेल. लाभदायक व खेळीमेळीचे संबंध तुम्ही तुमच्या बाेलण्याने बनवू शकाल. व्यावसायिक रूपात आठवडा लाभदायक राहील. आर्थिक फायदा मिळवू शकाल. सुख-आनंदाची प्राप्ती हाेईल. शुभसमाचार कळतील. आनंददायी प्रवास घडेल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित जमीन, इमारतीमध्ये नफा मिळण्याची दाट श्नयता आहे. दैनंदिन कामांमध्ये जास्त गुंतून राहणे टाळावे. ठरवलेल्या कामात अडथळे येऊ नये यासाठी स्वत:त संघर्ष वाढवणे लाभदायक ठरेल. या आठवड्यात वरिष्ठ तुमच्यासाेबत असतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात ज्यांना संततीसुख हवे असेल, त्यांची इच्छा पूर्ण हाेऊ शकते. तिमाहीचा अखेरचा काळ काैटुंबिक समस्या साेडवण्यासाठी उत्तम आहे.तुम्ही प्रयत्न करू शकता. कुटुंबात सुखद समारंभ संपन्न हाेतील. त्यामुळे कुटुंबीयांना एकत्र येण्याची संधी मिळू शकेल.
 
आराेग्य : या आठवड्यात शत्रूंकडून तणावाची स्थिती उत्पन्न हाेऊ शकते.एखाद्या प्रकारची दुखापत हाेण्याची श्नयता आहे. वातासंबंधित त्रास सतावू शकताे.जाेडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. या वेळी तिची तब्येत बिघडू शकते. गरीब व गरजूंना मदत करावे. मैदा व दह्याचे पदार्थ टाळावेत.
 
शुभदिनांक : 02, 03, 06
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात शिळे पदार्थ, कापून ठेवलेली फळे व दूषित पदार्थ खाणे टाळावे.
 
उपाय : या आठवड्यात शनिवारी उडीद एखाद्या भिकाऱ्याला दान करा वा कावळ्यांना खाऊ घाला