वृषभ

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
या आठवड्यात तुमच्या मनात निरनिराळ्या विचारांच्या लाटा उसळतील. तुम्ही त्या विचारांमध्ये हरवलेले राहाल. बाैद्धिक कामे करावी लागतील; पण वादात पडू नये. तुम्ही भावुक राहाल. विशेषत: आई वा महिलेच्या विषयांमध्ये जास्त भावुक राहाल. प्रवासयाेग आहेत पण श्नयताे प्रवास टाळावा.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायात तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवण्याची गरज असेल. या काळात काेणताही निर्णय जास्त हुशारीने घ्यावा. हाताखालील कर्मचारी या वेळी कमी सहकार्य देतील. याउलट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमची अडलेली कामे मार्गी लागतील.
 
नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबात एखादा शुभसमारंभ हाेण्याची श्नयता हाेईल. जाेडीदाराकडून संबंध सुधारण्याची सुरुवात हाेऊ शकते; पण तुमच्याकडून याबाबत त्रास करून घेण्याची श्नयता आहे. शेजारी व नातलगांद्वारे तुमचे काम पूर्ण हाेऊ शकते. कुटुंबाचेही सहकार्य लाभेल.
 
आराेग्य : पाेटदुखी, गॅसची तक्रार हाेण्याची श्नयता आहे. दूषित पाण्यामुळे समस्या वाढू शकतात. प्रवासात तुमच्या निष्काळजीपणामुळे काही गैरसाेय झाल्यामुळे मानसिक त्रास हाेऊ शकताे. जास्त धाडसी व जाेखीमयु्नक कामांपासून स्वत:ला दूर ठेवावे. काेणत्याही गाेष्टीवर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यावी.
 
शुभदिनांक : 02, 03, 06
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : हा आठवडा शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम आहे; पण गुंतवणुकीपूर्वी व्यवस्थित चाैकशी करावी.
 
उपाय : या आठवड्यात घरात काटेरी राेपे, झुडपे व झाड लावू नयेत. फळझाडे लावल्यास बुधाची अनुकूलता वाढते.