वृश्चिक

    03-Aug-2022
Total Views |
 
 

Pieces 
 
या आठवड्यात स्वजन भेटल्यामुळे तुम्हाला आनंद हाेईल. त्यांच्याशी प्रेमाच्या संबंधाने तुमच्या आनंदात भर पडेल. विराेधकांसमाेर धैर्याने टिकून राहाल. उत्साहकल्पकतेने परिपूर्ण हाेऊन आत्मविश्वासाने मेहनत कराल. मानसिक थकवा जाणवेल व विचारांमध्ये सामंजस्य राहील. वादाचे विषय टाळावेत.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या स्वभावात आत्मविश्वास जास्त राहिल्यामुळे कठीण व माेठ्या याेजनांच्या कामांत सातत्य राहील. तुमचे उत्पन्न काहीसे प्रभावित हाेण्याची श्नयता आहे. वरिष्ठांच्या सल्ल्याने काम करणे याेग्य ठरेल.संचयाबाबत चिंता सतावत राहील.
 
नातीगाेती : मित्रांची मदत मिळवण्यासाठी तुम्हाला विशेष त्रास हाेण्याची श्नयता आहे. मधल्या काळात तुमचा बहुतेक काळ मित्रांसाेबतचे आपले संबंध सुधारण्यात जाऊ शकताे. याशिवाय या काळात दांपत्य जीवनाविषयी रागाची स्थिती टाळणे याेग्य ठरेल. तुम्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमचे वागणे मवाळ ठेवायला हवे. जास्त तणाव स्वत:वर येणार नाही असे पाहावे. स्वत:चा त्रास माेकळेपणाने व्य्नत करू शकणार नाही. त्यामुळे मनातल्या मनात त्रस्त राहाल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
मुलांनाही त्रास हाेण्याची श्नयता आहे.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : घरात फाटके व खंडित धार्मिक पुस्तके व ग्रंथ ठेवू नयेत.
 
उपाय : या आठवड्यात घरात लाल फुलाचे राेप वा झाड लावून त्याची देखभाल करावी.