धनू

    03-Aug-2022
Total Views |

Pieces
या आठवड्यात तुम्हाला दूरवरच्या संदेश व्यवहारातून फायदा हाेईल. कुटुंबीयांकडून उत्तम सहकार्य लाभेल. मैत्रिणीही तुम्हाला मदत करू शकतात. उत्तम भाेजन मिळण्याचे याेग आहेत. तुम्ही तुमच्या मधुर वाणीने काेणाचेही मन जिंकू शकाल.कामांमध्ये यश मिळण्याची श्नयता आहे. आर्थिक लाभ हाेईल.
 
नाेकरी-व्यवसाय : उत्पन्नाचे नवे स्राेत उत्पन्न हाेण्याचे याेग हाेत आहेत.अधिकारी व सहकाऱ्यांमुळे याेजना वेळेत पूर्ण हाेऊ शकेल. वरिष्ठजनांचा अनुभव आर्थिक क्षेत्राच्या बाधा कमी करील. तुमचे परिश्रम, कार्यकुशलता उपयाेगी पडेल आणि या काळात यापूर्वी केलेल्या कामांतून फायदा मिळण्यास सुरुवात हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात कुटुंबीयांसाेबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. गैरसमजामुळे नात्यांवर परिणामाची श्नयता आहे. त्यामुळे त्यापासून दूर राहावे.
 
आराेग्य : कामाच्या थकव्यामुळे तुम्ही काहीसे शिथिल राहू शकता. पायांशी संबंधित त्रास त्रस्त करू शकताे. माेसमाचा प्रभावही तुमच्या तब्येतीसाठी काहीसा त्रास देणारा असेल. अपचन इ.ची तक्रार असल्यामुळे अन्नावरील वासना उडेल.हरभरा, माेडाचे वा भिजवलेले शेंगदाणे थाेडासा मेथ्या व ओवा मिसळून खा.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : पांढरा, गुलाबी, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात बाेलण्यापूर्वी शब्दांकडे लक्ष द्या. काेणत्याही मुद्यावर मत देताना उत्तेजित हाेऊ नका.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमंताच्या चरणीच्या शेंदराचा स्वत:च्या कपाळावर टिळा लावा व माकडांना गूळ व फुटाणे द्या