मीन

    03-Aug-2022
Total Views |
 

Pieces 
 
या आठवड्यात तुम्ही तुमची नेहमी मनाचे ऐकण्याची व मनाने काम करण्याची सवय बदला. काही बाबतीत मनाऐवजी मेंदूने विचार करणे उत्तम असते. तुमच्यात हाच एक माेठा दाेष आहे. तुम्ही प्रत्येक गाेष्टीचा मनाने जास्त विचार करता. ज्यामुळे स्वत:चेच नुकसान करून बसता. थाेडे सांभाळून राहा.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात नवा टप्पा गाठण्यासाठी तुम्ही गरजेपेक्षा जास्त श्रम कराल. आठवड्याच्या अखेरीपर्यंत तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील. बिझनेसला नवा वेग देण्यासाठी ताे पुन्हा एका नव्या याेजनेसाेबत सुरू करण्याची गरज आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही स्वत:ला कामात एवढे व्यस्त करून घ्याल की, कुटुंबातील माणसांसाठी वेळ काढणे तुम्हाला थाेडे कठीण जाईल. कामाच्या व्यापामुळे तुम्हाला बाहेर जाण्याचा एखादा काैटुंबिक प्लॅनही बदलावा लागू शकताे.याचा नात्यावर परिणाम हाेणार नाही, याची दक्षता घ्या.
 
आराेग्य : या आठवड्यात हृदयासंबंधित समस्या निर्माण हाेण्याची श्नयता आहे.काेणताही त्रास हाेत असल्यास बेपर्वा राहू नये. फुफ्फुसांसंबंधित जुनाट राेग पुन्हा उद्भवण्याची श्नयता आहे. बाहेरचे खाणेपिणे या आठवड्यात पूर्णपणे टाळावे.पावसात भिजू नये.
 
शुभदिनांक : 31, 01, 05
 
शुभरंग : पांढरा, लाल, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : डाेळे झाकून काेणावरही विश्वास ठेवू नका. व्यवहारी व्हा. स्वत:ला बाह्य अवडंबरापासून दूर ठेवा.
 
उपाय : या पूर्ण श्रावणात राेज महादेव पूजेसाेबतच महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा.