मृत्यूनंतर तीस वर्षांनी त्यांचा झाला विवाह

    03-Aug-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम :
 

Marriage 
 
मृत्यूनंतर तीस वर्षांनी त्यांचे लग्न लागले, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. ही काही तरी अतिंद्रिय घटना आहे, असेही तुम्हाला वाटेल; पण कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील काही भागांत ही प्रथा आहे.कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील शाेभा आणि चंद्रप्पा या दाेघांचा मृत्यूनंतर तीस वर्षांनी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. अर्थातच, हा सर्वसामान्य विवाह नव्हता. हा प्रेथा कल्याणम् म्हणजे मृतात्म्यांचा विवाह हाेता. ही परंपरा कर्नाटक आणि केरळमधील काही भागांमध्ये अजूनही पाळली जाते. ज्या व्यक्तींचा जन्म झाल्यावर लगेचच मृत्यू हाेताे, त्यांच्यासाठी ही प्रथा पाळली जातेत्यांच्या आत्म्यांचा सन्मान राखण्याची हा एक मार्ग आहे, असा एक समज आहे.यूट्यूबरनी अरुण याने या विवाहाची ट्विटरवर माहिती दिली. मी आज एका लग्नाला आलाे आहे. यात ट्विट करण्यासारखे काय असे तुम्हाला वाटेल; पण या लग्नातील वराचे निधन झाले आहे आणि वधूचेही निधन झाले आहे.
 
सुमारे तीस वर्षांपूर्वी. त्या दाेघांचे आज लग्न आहे, असे ट्विट अरुणने केले आहे. इतर लग्नांसारखेच विधी याही लग्नात करण्यात आले. मात्र वर-वधूच्या जागी त्यांच्या प्रतिमा वापरण्यात आल्या हाेत्या. लग्नासाठी वराकडच्यांनी वधूसाठी विशिष्ट प्रकारची साडी आणली हाेती. ही एक गंभीर विवाहपद्धती आहे. ज्यांचा जन्मतःचा मृत्यू झालेला असताे, त्यांचे एकमेकांशी लग्न लावले जाते. काेणत्याही सामान्य लग्नात जसे विधी केले जातात, तसेच विधी याही लग्नात केले जातात.दाेन्ही पक्ष एकमेकांच्या घरी जातात आणि साखरपुड्याची तारीखही ठरवतात, असे अरुणने लिहिले आहे. लग्नामध्ये सप्तपदीचा कार्यक्रमही केला जाताे. विशेष म्हणजे वधू-वराचे निधन झालेले असले, तरी लग्नात जसे उत्साहपूर्ण वातावरण असते, असेच वातावरण याही लग्नात असते. प्रत्येक जण विनाेद करीत असताे आणि चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करीत असताे. कारण हा समारंभच असताे. मात्र ज्यांचे लग्न लागणार असते, त्यांच्या आई-वडिलांना हे लग्न पाहण्याचा अधिकार नसताे. लग्न झाल्यानंतर जेवण असते. या जेवणात फिश फ्राय, चिकन सुक्क, कडले बाल्यर, मटण ग्रेव्ही आणि इडली अशाप्रकारचा मेन्यू असताे.